Join us

India vs West Indies, 2 nd test : सामन्यापूर्वीच मैदानात 'हे' महान फलंदाज कोसळले आणि थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी सबिना पार्क येथे सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 15:18 IST

Open in App

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी सबिना पार्क येथे सुरुवात झाली. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजचे महान फलंदाज आणि समालोचक सर विव रीचर्ड्स कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सामना सुरु होण्यापूर्वी  सर रीचर्ड्स हे समालोचन करण्यासाठी मैदानात उभे होते. यावेळी त्याची प्रकृती ढासळली आणि त्यांना त्यांना स्वयंसेवकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

वेस्ट इंडिज संघाने मालिका वाचवण्याच्या निर्धाराने दुसऱ्या कसोटीत ट्रम्प कार्ड खेळला. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी या कसोटी सामन्यासाठी ६ फुट उंच आणि १४० किलो वजनाच्या खेळाडूला संघात स्थान देत टीम इंडियाला कोंडित पकडण्याचा डाव टाकला आहे. कोण आहे हा खेळाडू?

२६ वर्षीय रहकिम कोर्नोवॉल असे या खेळाडूचे नाव आहे. कसोटी मालिकेसाठी विंडीजने जाहीर केलेल्या संघात स्थान मिळाल्यापासून कोर्नवॉल चर्चेत होता. पण पहिल्या कसोटीत त्याला संधी देण्यात आली नव्हती. कामगिरीसह त्याच्या वजनाचीच चर्चा अधिक रंगली होती. पण आज अखेरीस त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.

ॲंटिग्वा येथे जन्मलेल्या कोर्नवॉलची उंची ६.५ फुट आहे आणि १४० किलो वजन आहे. कसोटी संघात दाखल होण्यापूर्वी कोर्नवॉलने आपल्या तंदुरुस्तीसाठी बरीच मेहनत घेतली. विंडीज संघाचे डॉक्टर आणि ट्रेनर त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून होते.

कोर्नवॉलने स्थानिक क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. त्याने ९७ सामन्यांत २४.४३ च्या सरासरीनं २२२४ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व १३ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २६० विकेट्सही घेतल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिज