Join us

IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ

वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या डावात केल्या ३९० धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:56 IST

Open in App

India vs West Indies, 2nd Test Day 4 :  दिल्ली कसोटी सामन्यातील दुसऱ्या सामन्यात फॉलोऑनची नामुष्की ओढावलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली.  दोन शतकवीर आणि स्टिव्ह ग्रीव्ह्सनं दहाव्या विकेटसाठी सील्सच्या साथीनं केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाने डावाने पराभव तर टाळलाच, पण भारतीय संघासमोर १२१ धावांचे टार्गेट सेट करत सामान चौथ्या दिवशी नाही तर पाचव्या दिवसापर्यंत जाईल, अशी परिस्थिती निर्माण केली.  

पुन्हा डावाने मारण्याचा डाव फसला

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ५१८ धावांवर डाव घोषित केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर आटोपल्यावर गिलनं पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला. २७० धावा पिछाडीवर असल्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात त्यांना या धावसंख्येच्या आत ऑल आउट करत पहिल्या कसोटी सामन्या्प्रमाणहा सामनाही डावाने जिंकेल, असे वात होते. पण तसे घडले नाही.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील दोघांची शतके

 दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या ताफ्यातून दोघांनी शतकी खेळी साकारली. जॉन कॅम्बवेलन १९९ चेंडूत ११५ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय शई होप याने २१४ चेंडूत १०३ धावा कुटल्या. चौथ्या दिवशी शतक साजरे केल्यावर ते बाद झाल्यावर  कर्णधार रोस्टन चेस याने ७२ चेंडूत ४० धावांची उपयुक्त खेळी केली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जस्टिन ग्रीव्ह्स याने जेडन सील्सच्या साथीनं दहाव्या विकेटसाठी ७९ धावां मजबूत भागीदारी रचली. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या डावात ३९० धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघासमोर त्यांनी १२१ धावांचे टार्गेट सेट केले आहे. भारतीय संघ हा जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. पण या सामन्यात फॉलोऑन दिल्यावर चौथ्यांदा टीम इंडियावर बॅटिंग   दुसऱ्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले.  कसोटीच्या आतापर्यंतच्या इतिहासात या आधी फक्त तीन वेळा प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन दिल्यावर टीम इंडियाला दुसऱ्यांदा बॅटिंग करावी लागली होती. यात आता आणखी एक सामन्याची भर पडली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs WI: Centuries and tail-end resistance set India a target.

Web Summary : West Indies avoided an innings defeat thanks to two centuries and a resilient tenth-wicket partnership. India, after enforcing the follow-on, now need 121 runs to win the match.
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज