IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजनं कमालीची बॅटिंग केली. चौथ्या दिवसाच्या खेळात जॉन कॅम्पबेल ११५ (१९९) आणि शई होप १०३ (२१४) यांनी शतकी खेळी केल्यावर तंबूचा रस्ता धरला. ही दोघे परतल्यावर कॅरेबियन संघाला लवकर गुंडाळून चौथ्या दिवशीच विजयी डाव साधण्याची एक संधी निर्माण झाली. पण टीम इंडियाला ते जमलं नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जस्टिन ग्रीव्ह्सनं नाबाद फिफ्टीसह मैफिल लुटली
फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेस याने ७२ चेंडूत ४० धावांची खेळी केली. त्यानंतर पिक्चरमध्ये आला तो जस्टिन ग्रीव्ह्स. या पठ्ठ्यानं नाबाद अर्धशतकी खेळीसह लक्षवेधून घेतलं. जेडेन सील्सच्या साथीनं त्याने ७९ धावांची भागीदारी रचत संघाच्या धावफलकावर ३९० धावा लावल्या. जसप्रीत बुमराहनं ही जोडी फोडली आणि भारतीय संघाला १२१ धावांचे लक्ष्य मिळाले. जर ही जोडी जमली नसती तर भारतीय संघाने चौथ्या दिवशीच हा सामना जिंकला असता. पण आता टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी मैदानात उतरावे लागणार आहे. वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. सिराजनं दोन तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
पाचव्या दिवशी टीम इंडिया जिंकेल, पण चौथा दिवस वेस्ट इंडिजनं गाजवला
वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालच्या रुपात एक विकेट गमावत भारतीय संघाने ६३ धावा केल्या होत्या. लोकेश राहुल ५४ चेंडूचा सामना करत २५ धावांवर तर साई सुदर्शन ४७ चेंडूत ३० धावांवर नाबाद परतले. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी ५८ धावांची आवश्यता आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजला ९ विकेट्स मिळवायच्या आहेत. जे अशक्य आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी टीम इंडिया सामन्यासह वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका २-० जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. पण हा सामना पाचव्या दिवसांपर्यंत नेत वेस्ट इंडिजनं चौथा दिवस गाजवला आहे.
फॉलोऑन देण्याआधी गिल आता शंभरवेळा विचार करेल, कारण...
वेस्ट इंडिजचे फलंदाज सातत्याने संघर्ष करताना दिसले. पहिल्या डावात संघ २७० धावांनी पिछाडीवर राहिल्यावर शुबमन गिलनं फॉलोऑन दिला. पण दुसऱ्या डावात त्यांनी ताकद दाखवली. शतकवीरांनी चौथा दिवस काढला असता तर मॅचमध्ये आणखी ट्विस्ट निर्माण झाला असता. संघर्षानंतर कॅरेबियन बॅटर्संनी दाखवलेला तोरा हा शुबमन गिलला फॉलोऑन घेताना यापुढे शंभर वेळा विचार करायला भाग पाडेल, असाच होता.