टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठा डाव साधला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील कसर भरून काढताना यशस्वीनं दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने कसोटी कारकिर्दीत ३००० धावांचा टप्पाही पार केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वीनं साधला मोठा डाव, एका दणक्यात अनेक दिग्गजांना टाकलं माग
कसोटीत सर्वात जलदगतीने ३ हजार धावांचा पल्ला गाठणारा यशस्वी भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. भारताकडून त्याच्यापेक्षा जलदगतीने ३००० धावा करण्याचा विक्रम हा लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी १० हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या गावसकरांनी अवघ्या ६९ डावात कसोटी कारकिर्दीत ३ हजार धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालनं ७१ व्या डावात हा पराक्रम करून दाखवला आहे. या कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसह विद्यमान कर्णधार शुबमन गिल, राहुल द्रविड पॉली उम्रीगर आणि विराट कोहली या दिग्गजांना मागे टाकले आहे.
IND vs WI ...अन् 'लक फॅक्टर' गिलच्या कामी आला; पराभवाचा 'सिक्सर' पदरी पडल्यावर अखेर तो जिंकला!
कसोटीत भारताकडून सर्वात जलदगतीने ३००० धावा करणारे फलंदाज (डावानुसार)
६९ – सुनील गावस्कर
७१ – यशस्वी जैस्वाल*
७४ – सौरव गांगुली
७७ – शुभमन गिल
७८ – राहुल द्रविड़
७९ – पॉली उम्रीगर
८० – विराट कोहली