India vs West Indies 2nd ODI: दुसऱ्या सामन्यावरही पावासाचे संकट; खेळाडूंचा इनडोअर सराव

भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट अ‍ॅाफ स्पेन मैदानात रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 13:39 IST2019-08-11T13:38:25+5:302019-08-11T13:39:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs West Indies 2nd ODI: Rain crisis on second match; Indoor practice of players | India vs West Indies 2nd ODI: दुसऱ्या सामन्यावरही पावासाचे संकट; खेळाडूंचा इनडोअर सराव

India vs West Indies 2nd ODI: दुसऱ्या सामन्यावरही पावासाचे संकट; खेळाडूंचा इनडोअर सराव

पोर्ट अ‍ॅाफ स्पेन : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट अ‍ॅाफ स्पेन मैदानात रंगणार आहे. तसेच हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र या सामन्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील पहिला वन डे सामना रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आज रंगणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात देखील पावसाचे संकट असणार असल्याचे रिपोर्टनूसार समजते आहे. 

तसेच सामन्याआधी सराव करताना पावसाने व्यत्यय आणल्याने भारताचा फलंदाज रोहित शर्मा सराव करताना पाऊस आल्याने छत्री घेऊन मैदानाबाहेर जाताना दिसतो आहे. तर विकेटकिपर ऋषभ पंत थेट हॅाटेलच्या लॅाबीमध्येच सराव करताना दिसतो आहे.

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अ‍ॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.

Web Title: India vs West Indies 2nd ODI: Rain crisis on second match; Indoor practice of players