Join us

India vs West Indies 2nd ODI: भारताच्या 'या' युवा गोलंदाजाला आज मिळू शकते पदार्पणाची संधी

या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पण जर दुसरा सामना खेळवण्यात आला तर भारताच्या एका युवा वेगवान गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 16:37 IST

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज क्विंस पार्क ओव्हन येथे दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पण जर दुसरा सामना खेळवण्यात आला तर भारताच्या एका युवा वेगवान गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

भारतीय संघात दुसऱ्या सामन्यात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात एका गोलंदाजाला वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्वेन्टी-20 मालिकेत आपली छाप पाडणारा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला या सामन्यात पदार्पण करता येईल, असे म्हटले जात आहे.

पहिल्याच ट्वेन्टी-20 सामन्यात सैनीला संधी देण्यात आली होती. या सामन्यात सैनीने तीन विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतरही सैनीकडून सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली. पण सैनीला अजूनही एकदिवसीय सामना खेळता आलेला नाही. पण आज सैनीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट ऑफ स्पेन मैदानात रंगणार आहे. तसेच हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र या सामन्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील पहिला वन डे सामना रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आज रंगणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात देखील पावसाचे संकट असणार असल्याचे रिपोर्टनूसार समजते आहे. 

तसेच सामन्याआधी सराव करताना पावसाने व्यत्यय आणल्याने भारताचा फलंदाज रोहित शर्मा सराव करताना पाऊस आल्याने छत्री घेऊन मैदानाबाहेर जाताना दिसतो आहे.

प्रतिस्पर्धी संघभारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अ‍ॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज