Join us

India vs West Indies 2nd ODI: आज ख्रिस गेल करणार अनोखं 'त्रिशतक'

भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट अ‍ॅाफ स्पेन मैदानात रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 16:08 IST

Open in App

पोर्ट अ‍ॅाफ स्पेन: भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट अ‍ॅाफ स्पेन मैदानात रंगणार आहे. तसेच या सामन्यात वेस्ट इंडिचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद करणार आहे. 

भारताविरुद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. परंतु भारताविरुद्ध आज (रविवारी) रंगणारा दुसरा वन डे सामना खेळून नवीन विक्रमची नोंद करणार आहे, कारण गेलचा हा 300वा वन डे सामना असणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघासाठी 300 वन डे सामना खेळणारा ख्रिस गेल पहिलाच क्रिकेटपटू ठरणार आहे. वेस्ट इंडिजसाठी ब्रायन लाराने 299 वन डे सामने खेळले होते. 

त्याचप्रमाणे ब्रायन लाराचा आणखी एक विक्रम मोडीत काढण्याची संधी गेलकडे असणार आहे, कारण लाराचा विक्रम मोडीत काढण्यासाठी गेलला फक्त 9 धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजसाठी खेळताना लाराने वन डे सामन्यात 10405 धावा केल्या होत्या, तर गेलने 299 वन डे सामन्यात 10397 धावा केल्या आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजख्रिस गेल