India vs West Indies, 2 nd test : गेल्या सहा डावांमध्ये 'या' भारतीय खेळाडूने फोडला नाही भोपळा

आता गेल्या सहा डावांमध्ये एकही धाव न करता आलेल्या संघात का ठेवले आहे, असा प्रश्न तुम्ही विचाराल. नेमका हा खेळाडू आहे तरी कोण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 17:28 IST2019-09-01T17:27:34+5:302019-09-01T17:28:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs West Indies, 2nd nd test: Mohammad Shami has not hit single run in the last six innings | India vs West Indies, 2 nd test : गेल्या सहा डावांमध्ये 'या' भारतीय खेळाडूने फोडला नाही भोपळा

India vs West Indies, 2 nd test : गेल्या सहा डावांमध्ये 'या' भारतीय खेळाडूने फोडला नाही भोपळा

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यातही दमदार कामगिरी करत आपला वचक ठेवला आहे. पण भारताच्या संघात असा एक खेळाडू आहे की, त्याला गल्या सहा डावांमध्ये भोपळाच फोडता आलेला नाही. आता गेल्या सहा डावांमध्ये एकही धाव न करता आलेल्या संघात का ठेवले आहे, असा प्रश्न तुम्ही विचाराल. नेमका हा खेळाडू आहे तरी कोण...

आता वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यांमध्येही त्याला आपले खाते उघडता आलेले नाही. सध्या सुरु असलेल्या सबिना पार्क स्टेडियममध्येही त्याला भोपळा फोडता आला नाही. हा फलंदाज आहे भारताचा मोहम्मद शमी. गेल्या सहा डावांमध्ये शमीला एकही धाव करता आलेली नाही. यापूर्वी हा लाजीरवाणा विक्रम भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर होता. चंद्रशेखरदेखील सहा डावांमध्ये एकही धाव काढण्यात अपयशी ठरले होते.


पंचांनी नॉट आऊट दिल्यावरही झाली बुमराची हॅट्रिक; नेमका काय घोळ आहे...
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दुसऱ्या कसोटी सामन्यात हॅट्रिक साजरी केली. पण यावेळी मैदानावरील पंचांनी फलंदाजाला आऊट दिले नव्हते, पण तरीही बुमराने ही हॅट्रिक साजरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये गोलमाल नक्की आहे तरी काय...


या सामन्याच्या नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराने डॅरेन ब्राव्होला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर बुमराने ब्रुक्सला पायचीत बाद केले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बुमराने रोस्टन चेसविरुद्ध LBWची अपील केली. पण मैदानावरील पंचांनी चेसला नाबाद ठरवले होते. पण त्यानंतरही बुमराची हॅट्रिक झाली तरी कशी जाणून घ्या...


बुमराने चौथ्या चेंडूवर पंचांकडे दाद मागितली, पण त्यांनी चेस बाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बुमरा कोहलीच्या दिशेने गेला. त्यावेळी बुमराने हा रीव्ह्यू घ्यायलाच हवा, असे त्याने कोहलीला सांगितले. त्यावेळी कोहलीने रीव्ह्यू घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी चेस बाद असल्याचे जाहीर केले. 

भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली
सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात एक पराक्रम पाहायला मिळाला. पण हा पराक्रम पाहण्यासाठी भारताला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली.


भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये दादा समजला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा आहे. पण गेल्या 13 वर्षांमध्ये भारतालाही गोष्ट करता आली नव्हती. गेल्या 13 वर्षांमध्ये भारताने कसोटी क्रिकेटमध्ये बरेच विजय मिळवले. मालिकाही जिंकल्या, पण हा पराक्रम करायला तब्बल एका तपापेक्षा जास्त काळ जावा लागला.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने हॅट्रिक मिळवली. वेस्ट इंडिजच्या धर्तीवर हॅट्रिक पटकावणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. पण भारताला कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 13 वर्षांनी हॅट्रिक पाहण्याचा योग आला. कारण यापूर्वी इरफान पठाणने कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 2006 साली हॅट्रिक मिळवली होती. भारताकडून पहिली हॅट्रिक फिरकीपटू हरभजन सिंगने कोलकाता येथे 2001 साली पटकावली होती.

Web Title: India vs West Indies, 2nd nd test: Mohammad Shami has not hit single run in the last six innings