Join us

India vs West Indies 2nd Live Updates: भारताची पहिली फलंदाजी; राहुलचं संघात कमबॅक, पाहा कोण गेलं संघाबाहेर

टीम इंडियात उपकर्णधार राहुलचे पुनरागमन झाले असून त्यामुळे संघात बदल करण्यात आला आहे. पाहा Playing XI

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:30 IST

Open in App

India vs West Indies 2nd ODI Live: भारताविरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने टॉस गमावला. पण त्याचा जुना सलामीवीर साथीदार पुन्हा संघात आला. भारतीय संघात उपकर्णधार लोकेश राहुल परतला असून त्याजागी डावखुऱ्या इशान किशनला संघाबाहेर ठेवण्यात आले. इतर संपूर्ण संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. वेस्ट इंडिजच्या संघाकडून मात्र टॉससाठी कर्णधार कायरन पोलार्डच्या जागी निकोलस पूरन आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. पोलार्ड संघाबाहेर असल्याने पूरनवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाहा दोन्ही संघांचे Playing 11 -

--

भारताचा दुसऱ्या वन डे साठी संघ- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा

वेस्ट इंडिजच्या संघातून पोलार्ड बाहेर, असं आहे प्लेईंग 11 - निकोलस पूरन (कर्णधार), शाय होप, ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, फॅबियन ऍलन, अकिला होसेन, अल्झारी जोसेफ, केमार रोच 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजकिरॉन पोलार्डइशान किशनके. सिवन
Open in App