Join us
Daily Top 2Weekly Top 5

India Vs West Indies, 1st ODI: शे होपनं भारताविरुद्ध ओलांडला मैलाचा डोंगर

होप आणि हेटमायर या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाच्या चमूत चिंतेचं वातावरण निर्माण केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 19:57 IST

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. त्यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळीसह चौथ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. त्यांच्या संयमी आणि समजुतदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 8 बाद 287 धावांपर्यंत मजल मारली. केदार जाधव आणि रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीनंही अर्धशतकी भागीदारी करताना संघांच्या धावसंख्येत भर घातली. अय्यर 88 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 70 धावा केल्या. रिषभनं 69 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 71 धावा केल्या.  केदार जाधव व रवींद्र जाडेजा यांनी अखेरची काही षटकं खेळून काढताना संघाच्या धावसंख्येत भर घातली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. केदार 35 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 40 धावांवर माघारी परतला. 

लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला 11 धावांवर पहिला धक्का बसला. दीपक चहरनं पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुनील अॅब्रीसला ( 9) पायचीत केले. त्यानंतर शिमरोन हेटमायर व शे होप खेळपट्टीवर संयमी खेळ करत होते. 11 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर होपचा झेल रोहित शर्मानं स्लीपमध्ये सोडला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 14व्या षटकात विराट कोहलीनं हेटमारला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. होपनं मारलेला चेंडू विराटनं अडवला, परंतु होप आणि हेटमायर यांच्यावर धाव घेण्यावरून ताळमेळ राहिला नाही. अशात विराटनं लगेच थ्रो केला असता, तर ही जोडी तुटली असती.

हेटमारयनं फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. होप आणि हेटमायर या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाच्या चमूत चिंतेचं वातावरण निर्माण केलं. दुसरीकडे शे होप एका बाजूनं खेळपट्टीवर नांगर रोवून उभा होता. त्यानं भारताविरुद्ध वन डे सामन्यांत 500 धावांचा पल्ला ओलांडला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिज