Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs USA U19 World Cup 2026 Live : वैभव सूर्यवंशीसह युवा टीम इंडिया धमाकेदार सलामीसाठी सज्ज!

युवा टीम इंडिया U19 विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाचा षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:20 IST

Open in App

IND vs USA U19 World Cup 2026 Live Streaming :  युवा टीम इंडिया ICC अंडर-१९ विश्वचषकाच्या १६ व्या हंगामासाठी सज्ज आहे. गुरुवारी बुलावायो येथील मैदानात भारत आणि अमेरिका (USA) यांच्यातील ग्रुप A मधील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत कर्णधार आयुष म्हात्रेसहवैभव सूर्यवंशी हा केंद्रस्थानी असेल. यंदाच्या हंगामात १४ वर्षीय छोटा पॅक मोठा धमाका करेल, अशी अपेक्षा आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून गत हंगामात युवा टीम इंडियाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या हंगामात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील संघात वैभव सूर्यवंशीशिवाय एरॉन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू हे तगडे खेळाडू आहेत. यांच्या जोरावर युवा टीम इंडिया U19 विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाचा षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!

२०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकात, भारताचा समावेश ग्रुप A मध्ये न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत करण्यात आला आहे. सुपर सिक्स फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला लीग टप्प्यात दमदार सुरुवात करणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

U19 World Cup 2026 स्पर्धेसाटी भारतीय संघ

आयुष म्हात्रे (कर्णधार), आर.एस. अंब्रिश, कणिश्क चौहान, डी. दीपेश, मोहम्मद एनान, एरॉन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उधव मोहन, हेनिल पटेल, खिलान ए. पटेल, हरवंश सिंग, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी.

अमेरिकेचा संघ (USA) 

उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), अदनित झांब, शिव शनी, नितीश सुदिनी, अद्वैत कृष्णा, साहिर भाटिया, अर्जुन महेश, अमरिंदर गिल, सब्रिश प्रसाद, आदित कप्पा, साहिल गर्ग, अमोघ रेड्डी अरेपल्ली, ऋत्विक अप्पिडी, रायान ताज, ऋषभ शिंपी

 सामना कधी अन् कुठं रंगणार?

  • भारत विरुद्ध अमेरिका U19 विश्वचषक ग्रुप A सामना
  • गुरुवार, १५ जानेवारी
  • दुपारी १:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

 सामना कुठे होणार?

  • क्वीन स्पोर्ट्स क्लब, बुलावायो 

टीव्हीवर थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

  • स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (भारतामध्ये) 

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

  • JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर 
English
हिंदी सारांश
Web Title : India U19 World Cup squad ready for USA clash.

Web Summary : India's U19 team, led by Aayush Mhatre and featuring Vaibhav Suryavanshi, is set to begin their U19 World Cup campaign against the USA. Aiming for their sixth title, India will rely on a strong team to advance from Group A, which includes New Zealand and Bangladesh.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपवैभव सूर्यवंशीआयुष म्हात्रे