Asia Cup 2025 IND vs UAE, Third Umpire Given Out Suryakumar Yadav Withdrawn Appeal : आशिया कप स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने यूएईच्या संघाचा डाव १३.१ षटकांत ५७ धावांवर आटोपले. चांगली सुरुवात केल्यावर युएईच्या संघाने पाठोपाठ विकेट गमावल्या. जसप्रीत बुमराहनं पहिली विकेट घेतल्यावर कुलदीपच्या फिरकीतील जादू पाहायला मिळाली. यादरम्यान एक भन्नाट किस्सा घडला. रुमाल पडला अन् त्यामुळे UAE चा बॅटर धावबाद झाला. थर्ड अंपायरनं रिप्ले पाहून त्याला आउटही दिले. पण हे सगळं एका रुमालामुळं घडल्याचे लक्षात घेऊन भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं अपील मागे घेतले अन् आउट झालेला UAE चा बॅटर नॉट आउट ठरला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
नेमकं काय घडलं?
यूएईच्या डावातील १३ व्या षटकात शिवम दुबे गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी त्याने रनअप घेतले. चेंडूही टाकला.पण त्यावेळी त्यानं कंबरेला खेचलेला रुमाल पडला. त्यामुळे युएईचा बॅटर जुनैदच लक्षविचलित झालं. चेंडू निर्धाव खेळल्यावर तो क्रीज बाहेर आला अन् तसाच थांबून राहिला. विकेट मागे असलेल्या संजूनं थेट थ्रो मारत डाव साधला. थर्ड अंपायरनं विकेटही दिली. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवनं खिलाडूवृत्तीच दर्शन दाखवून देत अपील मागे घेत UAE च्या बॅटरला खेळण्याची एक संधी दिली. पण जुनैदला याचा फारसा फायदा उठवता आला नाही. पुढच्या चेंडूवरच तो ज्याने एक संधी दिली त्या सूर्यकुमार यादवच्या हाती झेल देऊन खातेही न उघडता माघारी फिरला.
Web Title: India vs United Arab Emirates, 2nd Match Junaid Siddique Forgot To Get Back Inside Crease Sanju Samson Direct Hit Third Umpire Given Out Suryakumar Yadav Withdrawn Appeal Because Batter Towel Shivam Dube
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.