Join us  

भारताची सामन्यावर मजबूत पडक, कोहली-रोहितची दमदार फलंदाजी

दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पुजारा आणि विराट कोहली यांच्यातील शतकी भागीदारीनंतर रोहित-कोहलीनं केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं श्रीलंकेवर 328 धावांची आघाडी मिळवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 12:01 PM

Open in App

नागपूर : दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पुजारा आणि विराट कोहली यांच्यातील शतकी भागीदारीनंतर रोहित-कोहलीनं केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं श्रीलंकेवर 315 धावांची आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या दिवशी पुजारा आणि कोहलीनं श्रीलंकेच्या गोलंदाजांना अक्षरशः जेरीस आणलं होतं. परंतु पुजाराला बाद करण्यात श्रीलंकेच्या दसूनला यश आल्यानं ही भागीदारी संपुष्टात आली. भारताकडे सध्या 328 धावांची आघाडी आहे. सध्या कोहली 182 आणि रोहित 63 धावांवर खेळत आहेत.

पुजाराने 143 धावा कुटल्या आहेत. पुजाराला विराट कोहलीनेही चांगली साथ दिली. तिसऱ्या दिवशीसुद्धा श्रीलंकेच्या गोलंदाजांना अपयश आलं आहे. पुजाराचा घेतलेल्या बळीव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजांवर दबाव टाकणं लंकेच्या गोलंदाजांना जमलं नाही. त्यामुळे उर्वरित दोन सत्रांत भारताच्या फलंदाजांना बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाजांना असं अपयश येत राहिल्यात भारताचा विजय सोपा होईल. तर दुस-या दिवशी सलामीवीर मुरली विजयसह (१२८ धावा, २२१ चेंडू, ११ चौकार, १ षटकार), चेतेश्वर पुजाराने (नाबाद १२१ धावा, २८४ चेंडू, १३ चौकार) वैयक्तिक शतके झळकावताना दुस-या विकेटसाठी केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने २ बाद ३१२ धावांची मजल मारली होती. श्रीलंकेविरुद्ध व्हीसीए जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या दुस-या कसोटी सामन्यावर भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. विजय बाद झाल्यानंतर पुजाराने अर्धशतकी खेळी करणा-या कर्णधार कोहलीसह (नाबाद ५४ धावा, ७० चेंडू, ६ चौकार) तिस-या विकेटसाठी ९६ धावांची अभेद्य भागीदारी केली आणि भारताला विशाल धावसंख्येचा पाया रचून दिला.२००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाची कसोटी याच मैदानावर खेळणा-या मुरली विजयने आठ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेट खेळताना श्रीलंकेविरुद्ध प्रथमच शतकाची वेस ओलांडली. त्याने कारकिर्दीतील दहावे शतक झळकाविले आणि दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी सलामीवीर म्हणून दावा अधिक मजबूत केला. फॉर्मात असलेले शिखर धवन व के.एल. राहुल यांच्यापाठोपाठ विजयनेही छाप सोडल्यामुळे संघ व्यवस्थापनासाठी सलामीवीरांची निवड करताना सुसह्य डोकदुखी निर्माण झाली आहे.श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांत गुंडाळणाºया भारताने दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेतली आहे. मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांनी झळकावलेली शतके दुस-या दिवसाच्या खेळाचे ठळक वैशिष्ट्य ठरली. अद्याप ८ विकेट शिल्लक असल्यामुळे भारत तिस-या दिवशी पहिल्या डावात किती धावांची आघाडी घेणार याची उत्सुकता आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी १२१ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या पुजाराला कर्णधार कोहली (५४) साथ देत होता. पहिल्या दिवशी याच खेळपट्टीवर संघर्ष करणा-या श्रीलंकेच्या फलंदाजांना  दुस-या दिवशी पुजारा, विजय व कोहली यांनी येथे कशी फलंदाजी करायची, याचा धडाच दिला.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ