Join us  

India Vs Sri Lanka, Latest News : विराट कोहलीनं शब्द पाळला, सुपर फॅनला मॅच तिकीट दिलं

India Vs Sri Lanka, Latest News, ICC World Cup 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 87 वर्षीय चारुलता पटेल या आज्जीबाईंनी सर्वांचे लक्ष वेधले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 4:56 PM

Open in App

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 87 वर्षीय चारुलता पटेल या आज्जीबाईंनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांचा उत्साह पाहून कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही त्यांची भेट घेण्याची उत्सुकता झाली होती. त्यामुळेच त्या सामन्यानंतर त्यांनी आज्जीबाईंची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वादही घेतला. त्यावेळी कोहलीनं चारुलता पटेल यांना पुढील सामन्याचं तिकीट देण्याचं कबुल केलं होतं आणि कोहलीनं शब्द पाळला. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीचं तिकीट कोहलीनं आज्जीबाईंना दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच उत्साहात आज्जीबाई टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या.टीम इंडियाच्या 'जबरा फॅन' आज्जीबाई दिसणार जाहिरातीत!पेप्सिको कंपनीनं त्यांच्या 'स्वॅग' मोहिमेत आज्जीबाईंना घेऊन एक जाहीरात बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पेप्सिकोची प्रतिस्पर्धी कोका कोला हे आयसासी वर्ल्ड कप स्पर्धेचे ग्लोबल स्पॉन्सर्स आहेत. त्यांनी आयसीसीसोबत पुढील पाच वर्षांसाठी जवळपास 300 कोटी रुपयांचा करार केला आहे. पेप्सिकोसह बियॉन्स आणि प्रियांका चोप्रा सारखे सेलेब्रिटी आहेत. आता चारुलता यांना पेप्सिको स्वॅग स्टार म्हणून समोर आणतील. पेप्सिकोच्या प्रवक्त्याने सांगितले की,''चारुलता पटेल यांची गोष्ट लोकांसमोर आणण्यात आम्हाला अभिमान वाटत आहे. या वयातही त्यांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम जगासमोर आणायला हवं. आयुष्य सुंदर आहे, ते तसे जगायला हवं.''

 

आज्जीबाईंचा 'आनंद' होणार द्विगुणित; कारण विश्वचषकाचे मिळणार फुकट तिकीटचारुलता ज्या भारताच्या विश्वचषकातील लढती पाहणार आहेत, त्या तिकीटांचे पैसे त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा 'आनंद' द्विगुणित होणार असून आता त्यांना सामन्याचे तिकीट फुकटच मिळणार आहे.  आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक घोषणा केली आहे. आपल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, " चारुलता यांना इंग्लंडमध्ये शोधा. कारण यापुढे विश्वचषकात भारताचे जे सामने होतील, त्या सामन्यांच्या तिकिटांचे पैसे मी त्यांना देणार आहे."

सामनावीर रोहित शर्माने केला 'सुपर फॅन'बरोबर आनंद साजराबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावले. विश्वचषकातील त्याचे हे चौथे शतक ठरले. भारताच्या विजयात रोहितने मोलाचा वाटा उचलला आणि त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोहितने आपला आनंद यावेळी स्पेशल फॅन'बरोबर साजरा केला. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019विराट कोहलीभारतश्रीलंका