Join us  

India vs Sri Lanka : टीम इंडिया राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेला भिडणार; अशी आहे 'दी वॉल'ची सपोर्ट टीम!

India vs Sri Lanka : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या ( Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 3:25 PM

Open in App

India vs Sri Lanka : शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या ( Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ( India Tour of Sri Lanka 2021) या दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे आणि बीसीसीआय या संघासोबत निवड समितीचे सदस्य अभय कुरुविला आणि देबाशिष मोहंती यांनाही पाठवण्याच्या तयारीत आहे. क्रिकबजनं दिलेल्या वृत्तानुसार, अभय व देबाशिष हे दोघंही मुंबईतच आहेत आणि ते श्रीलंकेला जाणाऱ्या सदस्यांसह क्वारंटाईन झाले आहेत. 

WTC Final हरल्यानंतर विराट कोहलीचा अपमान, न्यूझीलंडच्या वेबसाईटनं पोस्ट केला संतापजनक फोटो!

शिखर धवनकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असेल. राहुल द्रविड १८ सदस्यीय सहाय्यक सदस्यांसह मुख्य प्रशिक्षक म्हणून या संघाला मार्गदर्शन करणार आहे. आंतरराष्ट्रीय पॅनलचे माजी पंच सुधीर असनानी हे प्रबंधक म्हणून संघासोबत जातील. भारतीय संघ सोमवारी ( २८ जून) श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होईल. १३ जुलैपासून मालिकेला सुरुवात होईल.

राहुल द्रविडची सपोर्ट टीम - राहुल द्रविड ( मुख्य प्रशिक्षक), सुधीर आसनानी ( प्रबंधक), पारस म्हाम्ब्रे ( गोलंदाजी प्रशिक्षक), टी दिलीप ( क्षेत्ररक्षण प्रशिक्षक), आशीष कौशिक ( फिजिओ), नारायण पंडित ( फिजिओ), आनंद दाते ( ट्रेनर), एआय हर्ष ( ट्रेनर), अशोक साध ( सहाय्यक प्रशिक्षक - थ्रोडाऊन स्पेशालिस्ट), सौरव अंबडकर  ( थ्रोडाऊन स्पेशालिस्ट), नंदन मांझी ( मालीश), मंगेश गायकवाड ( मालीश), एल वरूण ( विश्लेषक), आनंद सुब्रमण्यम ( मीडिया व्यवस्थापक), अमेय तिलक ) कंटेंट प्रोडुसर), अभिजीत साळवी ( टीम डॉक्टर), रवींद्र धोलपूरे ( भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा अधिकारी), सुमीत मल्लापुरकर ( लॉजिस्टिक्स मॅनेजर). 

भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया

नेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग 

स्पर्धेचे वेळापत्रक

वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो

ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाराहूल द्रविडशिखर धवन