Join us  

India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार 

टीम इंडियानं या महत्त्वाच्या सामन्यात संघात तीन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 7:32 PM

Open in App

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार आहे. टीम इंडियानं दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाचा महत्त्वाचा आहे. टीम इंडियानं या महत्त्वाच्या सामन्यात संघात तीन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आज केलेल्या बदलात एक खेळाडू तब्बल 1637 दिवसांनी टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये स्थान पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. 

India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल 

India vs Sri Lanka, 3rd T20I : पुण्याचा इतिहास जाणून श्रीलंकेनं संधी साधली अन्...

कर्णधार विराट कोहली या सामन्यात तरी बाकावर बसलेल्या खेळाडूंना संधी देईल का, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर कोहलीनं संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि मनीष पांडे यांना संधी दिली आहे. आजच्या सामन्यात कुलदीप यादव, रिषभ पंत आणि शिवम दुबे यांना विश्रांती दिली आहे. कोहली म्हणाला, '' आम्हालाही पहिली फलंदाजीच करायची होती. आजच्या सामन्यात कुलदीपच्या जागी चहलला संधी मिळाली आहे. संजू सॅमसन आणि मनीष पांडे हे रिषभ पंत व शिवमच्या जागी संघात खेळणार आहेत.'' 

रिषभ पंतला बाकावर बसवून आजच्या सामन्यात खेळणाऱ्या संजू सॅमसनला अखेर संधी मिळाली. त्यानं 19 जुलै 2015मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला होता. त्यानंतर दुसरा सामना खेळण्यासाठी त्याला तब्बल 1637 दिवस प्रतीक्षा पाहावी लागली. 

भारताकडून दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी सर्वाधिक प्रतीक्षा पाहावी लागणाऱ्या फलंदाजांत संजू सॅमसनचे नाव आघाडीवर आले आहे. त्याला दुसरा सामना खेळण्यासाठी टीम इंडियाचे 73 सामने मैदानाबाहेर बसून पाहावे लागले. उमेश यादवच्या दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2012 ते 2018 या कालावधीत 65 सामने प्रतीक्षा पाहावी लागली. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघ