भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध आता संपुष्टात आल्यात जमा आहे. टीम इंडियात संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनं या क्रमांकावरील दावा पक्का करताना सातत्यपूर्ण खेळी केली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वादळी खेळी केली. शिखर धवन आणि लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर अय्यरनं कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाला विजय मिळवून देताना महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या खेळीनं विराटलाही प्रभावित केले. अय्यरनं मारलेला उत्तुंग षटकार पाहून विराटचे डोळे विस्फारले.
विराटचा आणखी एक जलद पराक्रम, धोनीसह अनेक दिग्गजांचे मोडले विक्रम
सामन्याचे हायलाईट्स...
दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अय्यरने 26 चेंडूंत 34 धावा केल्या. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले 143 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं 7 विकेट व 15 चेंडू राखून पार केले. टीम इंडियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. गुवाहाटी येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना पुण्यात होणार आहे. अय्यरनं त्याच्या खेळीत तीन चौकार व एक षटकार खेचला. वाहिंदू हसरंगाच्या चेंडूवर अय्यरनं टोलावलेला षटकार पाहून विराट अवाक् झाला... 16व्या षटकात मारलेला षटकार हा स्टेडियमच्या छताला लागून मैदानावर परतला.
विराट कोहलीच्या 'नटराज' स्टाईलचा धुरळा; षटकार खेचून जिंकला सामना; Video
2020तील पहिलीच धाव अन् विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड!
पाहा व्हिडीओ...