Join us  

IND vs SL 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का, सामन्यापूर्वीच प्रमुख खेळाडूला झाली दुखापत; BCCIकडून मोठे अपडेट्स!

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 3:07 PM

Open in App

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या टीम इंडियानं आजच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव व इशान किशन यांना वन डे संघात पदार्पणाची संधी दिली आहे. (  Ishan Kishan and Suryakumar Yadav making the ODI debut for India). २०१९च्या वर्ल्ड कपनंतर प्रथमच 'कुल-चा' अर्थात कुलदीप यादव व युजवेंद्र चहल ही फिरकीपटूंची जोडी एकत्र संघात खेळणार आहे. पण, या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे प्रमुख खेळाडूला अंतिम ११मधून बाहेर रहावे लागले आहे. 

मुंबई इंडियन्सच्या इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत इशान व सुर्या यांनी एकत्रच ट्वेंटी-२० संघात पदार्पण केलं होतं अन् आज वन डे संघातही ही दोघं सोबतच पदार्पण करत आहेत. २०१९च्या वर्ल्ड कपनंतर कुलदीप यादव व युझवेंद्र चहल ही जोडी पुन्हा एकत्र खेळणार आहे. 

भारतीय संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दीपक चहर

संजू सॅमसनला दुखापत...भारताचा प्रमुख यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे पहिल्या वन डे साठी त्याच्या नावाचा विचार केला गेला नसल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केलं. ( Sanju Samson sprained a ligament in his knee and was hence not available for selection for this game. The medical team is tracking his progress at the moment) 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासंजू सॅमसनबीसीसीआय