Join us  

India vs South Africa, 3rd Test: रोहित, अजिंक्यच्या खेळीनं दिवस गाजवला; अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 3:11 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहित 164 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117, तर अजिंक्य 135 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी 3 बाद 224 धावा केल्या आहेत.

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माअजिंक्य रहाणे