Join us  

India vs South Africa, 3rd Test : धोनीच्या मैदानात रोहितची कसोटी

पहिल्याच सामन्यात रोहितने दोन शतके झळकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 9:10 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा सलामीवीर रोहित शर्माला पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला आणले. आपल्या पहिल्याच सामन्यात रोहितने दोन शतके झळकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. आता तर रांचीच्या मैदानात पहिली कसोटी सामना खेळायला रोहित शर्मा उतरणार आहे.

रोहितने पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 303 धावा केल्या होत्या. पण पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र रोहितला छाप पाडला आली नव्हती. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

रोहितने आतापर्यंत बरेच एकदिवसीय सामने रांचीच्या मैदानात खेळले आहेत. पण रोहितला एकही कसोटी सामना रांचीच्या मैदानात खेळता आलेला नाही. हे मैदान महेंद्रसिंग धोनीचे आहे. त्यामुळे धोनीच्या मैदानात रोहितची कसोटी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा व अखेरचा कसोटी सामना 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत आफ्रिकेवर उरलेली इभ्रत वाचवण्याचे आव्हान असणार आहे. तिसऱ्या कसोटीसाठी आफ्रिकेचा संघ बुधवारी रांचीत दाखल झाला, तर भारताचे केवळ पाचच खेळाडूंचं येथे आगमन झालं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ रांचीत दाखल झाला असताना भारताचे मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, इशांत शर्मा आणि हनुमा विहारी हे पाच खेळाडू येथे दाखल झाले आहेत. कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडू येत्या एक-दोन दिवसांत रांचीत दाखल होतील, अशी माहिती आहे.

दुसरा कसोटी सामना 13 ऑक्टोबरल संपला होता. त्यानंतर तिसऱ्या कसोटीपर्यंत खेळाडूंकडे सहा दिवसांचा कालावधी होता. त्यामुळेच कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आमि मोहम्मद शमी यांच्यासह अन्य खेळाडू आपापल्या घरी गेले. हे खेळाडू गुरुवारी किंवा शुक्रवारी रांचीत दाखल होतील. कोहली, रहाणे व  रोहित हे तिघेही पुण्यातून थेट मुंबईत दाखल झाले होते. 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका