Join us  

India Vs South Africa, 3rd Test : ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींचा प्रताप; आता झाला डोक्याला ताप

नेमकं शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममध्ये केलं तरी काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 10:32 AM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे. एकिकडे भारताच्या विजयाची चर्चा सरु आहे, तर दुसरीकडे रवी शास्त्रींच्या ड्रेसिंग रुममधील एका प्रतापाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. नेमकं शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममध्ये केलं तरी काय...

यापूर्वी शास्त्री बऱ्याचदा ट्रोल झालेले आहेत. पण आता पुन्हा एकदा चाहत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. एकिकडे भारतीय संघ मैदानात दमदार कामगिरी करत असताना शास्त्री मात्र चक्क झोपल्याचे पाहायला मिळाले. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला असून आता चाहत्यांनी शास्त्री यांना ट्रोल केले आहे. त्यामुळे आता शास्त्री यांच्या डोक्याला ताप वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय संघाने तब्बल 84 वर्षांचा विक्रम मोडत केला भीमपराक्रमभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना भारताने जिंकला. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 84 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. भारताने हा भीमपराक्रम पहिल्यांदाच केल्याचे पाहायला मिळत असल्याचे वृत्त आहे.

भारताने या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन वेळा दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला तब्बल दोनदा फॉलोऑन देऊन मोठे विजय मिळवलेले नाहीत. त्याचबरोबर आतापर्यंत एका मालिकेत दोन किंवा त्यांच्यापेक्षा जास्तवेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याची घटना तब्बल 84 वर्षांनी घडली आहे. यापूर्वी 1935 साली ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला होता. त्यांनी तब्बल सलग तीन सामन्यांमध्ये फॉलोऑन देत सामना जिंकला होता.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना भारताने जिंकला. भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे. या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक इतिहास रचला आहे.

आपल्याच मातीमध्ये भारताच्या कर्णधाराला विराटसारखी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने आपल्याच मैदानात तब्बल तीनवेळा प्रतिस्पर्ध्यांना व्हाइट वॉश देण्याची किमया साधली आहे. आतापर्यंत एकाही भारताच्या कर्णधाराला आपल्याच मैदानात तीन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन करता आलेले नाही. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दिनने दोन वेळा दोन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन केले होते.

भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली. 

टॅग्स :रवी शास्त्रीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका