India vs South Africa, 2nd Test : ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधाराबरोबर कोहलीने केली बरोबरी

शतकासह कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एका महान कर्णधाराशी बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 02:07 PM2019-10-11T14:07:47+5:302019-10-11T14:08:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 2nd Test: Virat Kohli equalizes with Australia's great captain | India vs South Africa, 2nd Test : ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधाराबरोबर कोहलीने केली बरोबरी

India vs South Africa, 2nd Test : ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधाराबरोबर कोहलीने केली बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 26वे शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एका महान कर्णधाराशी बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक विजय मिळवून देणारा कर्णधार म्हणजे रिकी पाँटिंग. कसोटी क्रिकेटमध्ये पाँटिंगने 26 शतके लगावली होती. कोहलीने आज 26वे शतक झळकावत पाँटिंगच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

भारताच्या इतिहासातील कोहली ठरला सर्वोत्तम क्रिकेटपटू, सचिनलाही पिछाडीवर टाकले
भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला आहे. कोहलीने यावेळी भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही पिछाडीवर टाकले आहे.

पुण्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमधील कोलहीचे हे 26वे शतक ठरले. कोहलीने 173 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केले. उपहाराच्यावेळी कोहलीने 182 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 सामने खेळले. या 200 सामन्यांमध्ये सचिनने 53.78 च्या सरासरीने 15921बनवले आहेत. कोहलीने आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम नोंदवला आहे. कोहलीने जेव्हा 104 धावा केल्या तेव्हा त्याने 6904 धावा केल्या होत्या, यावेळी त्याची सरासरी होती 53.93.

विराट कोहलीने या वर्षात पहिल्यांदा 'ही' गोष्ट केली
सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. कोहली हा धावांचा डोंगर नेहमीत उभारतो. पण या वर्षात मात्र कोहलीला जास्त धावा करता आलेल्या नाही. या सामन्यापूर्वी कोहलीने बरेच विक्रम केले, पण एक गोष्ट मात्र त्याला करता आली नव्हती.

यंदाच्या वर्षात भारताने जवळपास सर्वच सामने जिंकले आहेत. पण कोहलीला मात्र या वर्षात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोहली हा सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडेल, असे बऱ्याच जणांना वाटते. पण कोहलीला या वर्षात एकही कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नव्हते.

या वर्षात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळला. या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने दोन अर्धशतके झळकावली. या चार सामन्यांमध्ये कोहलीची सर्वाधिक धावसंख्या 76 आहे. त्यामुळे या वर्षातील त्याचे हे पहिले कसोटी शतक ठरले आहे.


विराट कोहलीने मोडला भारताच्या कर्नलांचा विक्रम
भारताचा कर्णधार विराट कोहलीने पुण्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली. ही फलंदाजी करताना कोहलीने भारताच्या कर्नलांचा विक्रम मोडल्याचेही पाहायला मिळाले.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले होते. पण त्यावेळी कोहली या विक्रमापासून थोडा लांब होता. पण दुसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करत कोहलीने भारताच्या कर्नलांचा विक्रम मोडीत काढला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भारताचे कर्नल होण आणि कोणता विक्रम...

भारताचे कर्नल म्हणजे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर. कसोटी कारकिर्दीमध्ये वेंगसरकर यांनी आतापर्यंत 6868 धावा केल्या होत्या. कोहलीने मात्र आज दमदार फलंदाजी करत वेंगसरकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

Web Title: India vs South Africa, 2nd Test: Virat Kohli equalizes with Australia's great captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.