Join us  

India vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...

या सामन्यात कोणत्या अकरा भारतीय क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळेल, हे तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 7:01 PM

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T-20 सामना उद्या मोहालीमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट नाही. त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. पण या सामन्यात कोणत्या अकरा भारतीय क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळेल, हे तुम्हाला माहिती आहे का...

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या T-20 विश्वचषकासाठी भारताची संघ बांधणी सुरु आहे. त्यामुळे या सामन्यापासून संघामध्ये काही प्रयोग सुरु आहेत. या सामन्यातील संघात रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली हे तिघे असतील. त्याचबरोबर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनांही संधी मिळणार आहे. हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधूही अंतिम 11 खेळाडूंमध्ये असतील, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर अष्टपैलू रवींद्र जडेजा, फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर व नवदीप सैनी हे दोन वेगवान गोलंदाज असतील, असे म्हटले जात आहे.

भारताचा संभाव्य संघ :रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, नवदीप सैनी.

जोरदार पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-20 सामना रद्द करण्यात आला. धर्मशाला येथे दुपारी चार वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरु झाला. त्यानंतर सतत पाऊस पडत असल्यामुळे मैदानातील संपूर्ण पाणी बाहेर काढता येत नव्हते. पंचांनी मैदानाच्या परिस्थितीची पाहणी केली आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताचा आता दुसरा सामना मोहाली येथे होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मोहाली येथील सामन्यात धावांचा पाऊस अनुभवायला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

धर्मशाला येथील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मोहालीमध्ये मात्र पावासाचे वातावरण नाही. मोहालीमध्ये सध्याच्या घडीला 28 ते 31 डिग्री एवढे तापमान आहे. त्यामुळे मोहालीमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्यानेही सांगितले आहे.

गेल्या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ट्वेन्टी-20 मालिका जिंकली होती. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी भारतावर जास्त दडपण असल्याचे म्हटले जात आहे. त्यामध्येच पहिला सामना रद्द करावा लागला आहे. त्यामुळे आता मालिकेत फक्त दोनच सामने उरले आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास भारताला मालिका जिंकता येईल, पण एक जरी सामना भारताने गमावला तर त्यांना मालिका जिंकता येणार नाही.

दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना सुरु झाल्यावर अर्ध्या तासामध्ये पावसाचे आगमन होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण हा पाऊस जोरदार नसेल, त्याचबरोबर जास्त वेळ पावसामुळे वाया जाणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आता पाऊस बाजी मारणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्माशिखर धवनहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्यारवींद्र जडेजा