Join us  

India Vs South Africa 2018 : विराट कोहलीच्या या निर्णयाने आम्ही हैराण झालो - फॅफ डु प्लेसिस

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 2:00 PM

Open in App

केपटाऊन : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 धावांत गुंडाळण्याची करामत करून दाखविली. परंतू भारतीय फलंदाजांना विजयासाठी 208 धावांचे आव्हानही पेलवले नाही. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने 3 कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डु प्लेसिस म्हणाला, ''350 धावांचं लक्ष्य देऊन भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करावं असा आमचा विचार होता, पण आम्ही अपयशी ठरलो. मी नर्वस होतो, नव्या चेंडूने विकेट घेणं महत्वाचं ठरेल, भारताकडे चांगले फलंदाज आहेत पण जर नव्या चेंडूने विकेट घेतल्या तर भारताला बाद करू शकतो याचा विश्वास होता.  दुस-या डावातही डेल स्टेन असता तर भारताला आणखी लवकर बाद करू शकलो असतो''. 

''पहिल्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माची निवड झाल्याने हैराण होतो. इशांत शर्मा आणि उमेश यादव यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या जागी जसप्रित बुमराहला संधी मिळाल्यानेही हैराण होतो. बुमराहला संघात जागा मिळेल असं वाटल नव्हतं, मर्यादित षटकांच्या खेळात त्याने चांगली कामगिरी केली आहे हे माहित होतं पण आम्ही इतर गोलंदाजांची तयारी करत होतो'' असंही डु-प्लेसिस म्हणाला.          

पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच रहाणेला 11 मध्ये संधी देण्यात यावी असे प्रत्येक दिग्गजाचे मत होते. पण सामन्यावेळी संघनिवड करताना विराट कोहली आणि रवी शात्रीने फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहित शर्माला संधी दिली. रोहित शर्मा दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. त्याला आपल्या दोन्ही डावामध्ये आपली उपयोगिता सिद्ध करता आली नाही. रहाणेची परदेशातील कामगिरी उल्लेखनीय आहे.  घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करु न शकणाऱ्या अजिंक्य रहाणेची आफ्रिकेतली कामगिरी मात्र चांगली आहे. वर्षभरापूर्वी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणे सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला होता. यावेळी चेतेश्वर पुजाराने 280 धावांसह पहिला क्रमांक, विराट कोहलीने 272 धावांसह दुसरा क्रमांक आणि अजिंक्य रहाणेने 209 धावांसह तिसरा क्रमांक पटकावला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहलीरोहित शर्माअजिंक्य रहाणेजसप्रित बुमराह