Join us  

India Vs South Africa 2018 : पांड्याची विकेट अन् डु प्लेसिसचं Kiss, पण भडकली रबाडाची गर्लफ्रेंड

येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेन भारताचा 72 धावांनी पराभव केला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताकडून  हार्दिक पांड्यानं 91 धावांची एकाकी झुंज दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 6:17 PM

Open in App

केपटाऊन - येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेन भारताचा 72 धावांनी पराभव केला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताकडून  हार्दिक पांड्यानं 91 धावांची एकाकी झुंज दिली होती. त्याच्या खेळीनं दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील धास्तावला होता. भारतीय संघाचा तारणहार ठरलेल्या हार्दिक पंड्याची विकेट घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने गोलंदाज कागिसो रबाडाचं चुंबन घेतलं होतं. या चुंबनामुळे आपली गर्लफ्रेंड रुसल्याची मजेशीर कमेंट रबाडानं केली आहे.

पांड्याच्या विकेटचं महत्त्व दक्षिण आफ्रिकेच्या संघाला माहित होतं, म्हणूनच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डु प्लेसिसनं आनंदाच्या भरात रबाडाला कपाळावर किस केलं. त्याचा तो फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. हा फोटो डु प्लेसिसनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. तुम्ही अव्वल नंबरचे गोलंदाज होता, तेव्हा तुम्हाला ही भेट मिळते, अशी कॅप्शन त्यानं लिहिली होती. त्यावर रबाडानेही कमेंट केली. या कमेंटमध्ये रबाडाने लिहिलं की, माझी गर्लफ्रेन्ड यावर तक्रार करत आहे. या फोटोला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं आहे. 

पहिल्या कसोटी सामन्यात व्हेरनॉन फिलँडर, मॉर्ने मोर्केल आणि कागिसो रबाडा या त्रिकुटापुढे भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले होते. एकट्या हार्दिक पंड्यानं 93 धावांची झुंजार खेळी करून भारताचा डाव सावरला होता.

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 धावांत गुंडाळण्याची करामत करून दाखविली. परंतू भारतीय फलंदाजांना विजयासाठी 208 धावांचे आव्हानही पेलवले नाही. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने 3 कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील पुढील सामना 13 जानेवारी रोजी रंगणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८हार्दिक पांड्या