Join us  

India vs South Africa, 1st Test : रोहितची फलंदाजी सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही 'भारी', पाहा ही आकडेवारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : हिटमॅन रोहित शर्मानं प्रथमच कसोटीत सलामीला येताना अनेक विक्रमांना गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 12:55 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : हिटमॅन रोहित शर्मानं प्रथमच कसोटीत सलामीला येताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. पण, त्याची ही यशस्वी घोडदौड 176 धावांवर संपुष्टात आली. त्यानं 170 पेक्षा अधिक धावा करताना वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आणि याची नोंद करून त्यानं ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांचाही विक्रम मोडला.

रोहित-मयांक जोडीला पहिला मान, आफ्रिकेविरुद्ध सांभाळली कमान

मयांक - रोहितनं विक्रम रचला, सेहवाग-गंभीरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

दुसरी धाव अन् रोहित-मयांकने मोडला 83 वर्षांपूर्वीचा विक्रम

रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 72.13च्या स्ट्राईक रेटनं 176 धावा केल्या. यासह घरच्या मैदानावर कसोटीत 100च्या सरासरीनं धावा करण्याचा मान त्यानं पटकावला. किमान दहा डावांत सर्वाधिक सरासरीनं धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. या विक्रमात त्यानं ब्रॅडमन यांना मागे टाकले. ब्रॅडमन यांनी 50 डावांत 4322 धावा केल्या आहेत आणि त्यांची सरासरी 98.22 इतकी आहे. आजच्या खेळीनं रोहितला ब्रॅडमन यांच्यापेक्षा भारी बनवलं आहे.  घरच्या मैदानावर रोहितची कसोटीतील सरासरी 100.07* इतकी झाली आहे. 

OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

बिनबाद 202 धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना या जोडीनं दुसरी धाव घेताच नव्या विक्रमाची नोंद केली. या जोडीनं 83 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आणि भारताकडून सलामीला सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या जोडीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावले. रोहितने दिवसाच्या तिसऱ्याच चेंडूवर चौकार खेचून हा विक्रम केला. गुरुवारी दुसऱ्या दिवशी या जोडीनं दुसरी धाव घेताच 1936सालचा विक्रम मोडला. भारताकडून सलामीला सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या जोडीत रोहित-मयांकने दहाव्या स्थानी झेप घेतली. 

त्यांनी 204 धावांची भागीदारी करताच विजय मर्चंट आणि सय्यद मुश्ताक अली यांचा विक्रम मोडला. या दोघांनी 1936च्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे 203 धावांची सलामी दिली होती. पण, दहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप मारण्यासाठी रोहित-मयांकला अवघी 21 षटकं लागली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम या जोडीनं नावावर केला. त्यांनी 2008च्या राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवागचा 268 धावांचा विक्रम मोडला.  या विक्रमात विनू मंकड आणि पंकज रॉय हे अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 1956मध्ये चेन्नई कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध 413 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर राहुल द्रविड आणि सेहवाग ( 410 वि. पाकिस्तान, 2006) यांचा क्रमांक येतो. 

मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास

रोहित कसोटीत घरच्या मैदानावर कोहलीपेक्षा बेस्ट? आकडेवारी पाहा अन् ठरवा

वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं

तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'

हिटमॅन रोहितची सॉलिड सुरुवात, 'दी वॉल'च्या विक्रमाशी बरोबरी

रोहित ठरला 'हिट'; पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा चौथा ओपनर

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मासर डॉन ब्रॅडमन