Join us  

India Vs South Africa, 1st Test: भारताचा दणदणीत विजय

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 1:50 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

शनिवारच्या 1 बाद 11 या धावसंख्येवरून दक्षिण आफ्रिकेने आज सुरुवात केली. भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे 395 धावांचे आव्हान ठेवले होते. शमीने पाच आणि रवींद्र जडेजाच्या चार बळींच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या डावात रोहित-मयांक जोडीला साजेशी सुरुवात करता आली नाही. मयांक अवघ्या 7 धावा करून माघारी परतला आणि भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसल्या.

पहिल्या डावात रोहितच्या दिडशतकी खेळीनंतर मयांकने केलेल्या विक्रमी द्विशतक झळकावलं. पहिल्या दिवसाच्या बिनबाद 202 धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळात रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामोहम्मद शामी