Join us  

India vs South Africa, 1st T20I: रोहित की विराट कोण ठरणार सरस, चाहत्यांना उत्सुकता...

या मालिकेच्या पहिल्या सामन्यापासूनच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये विक्रमांची शर्यत पाहायला मिळणार आहे. आता यामध्ये बाजी कोण मारतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 3:07 PM

Open in App

धर्मशाला, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेच्या पहिल्या सामन्यापासूनच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये विक्रमांची शर्यत पाहायला मिळणार आहे. आता यामध्ये बाजी कोण मारतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार कोहलीला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. रोहित 53 धावांच्या आघाडीसह अव्वल स्थानावर आहे. कोहलीला या विक्रमात रोहितला मागे टाकण्याची संधी आहे. रोहितनं 88 डावांत 2422 धावा केल्या आहेत, तर कोहलीच्या नावे 65 डावांत 2369 धावा आहेत. दुसरीकडे रोहितला कोहलीच्या एका विक्रमाच्या जवळ जाण्याची संधी आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या विक्रमात कोहली 21 अर्धशतकांसह आघाडीवर आहे. रोहितच्या नावावर 17 अर्धशतकं आणि चार शतकं आहेत. त्यामुळे या सामन्यात रोहितने मोठी खेळी साकारली तर ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50पेक्षा जास्त धावांचा विक्रम रोहितच्या नावावर होऊ शकतो.

भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याला आज (रविवार) पासून सुरुवात होत आहे. धर्मशाला येथे पहिला ट्वेंटी-20सामना खेळवण्यात येणार असून वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. तसेच आज देखील पावसाची शक्याता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हवामान खात्याने सांगितले की, पुढील पाच दिवसात हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची दाट शक्यता असून आज होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच बीसीसीआयने देखील शनिवारी एक फोटो ट्विट करत शेअर केला आहे. यामध्ये मैदानाजवळील भागात काळे ढग दाटून आल्याचे दिसते आहे.

संभाव्य संघ 

भारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी. 

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा  हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका