Join us  

IND Vs SL 3rd T20I Live : पहिल्या दहा षटकांत टीम इंडियाच्या ५ बाद ३९ धावा, दासून शनाकाचा अफलातून झेल, Video

India vs Sri Lanka 3rd T20I :  टीम इंडियानं तिसऱ्या व निर्णायक सामन्यात तामिळनाडूचा जलदगती गोलंदाज संदीप वॉरियर याला पदार्पणाची संधी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 8:52 PM

Open in App

India vs Sri Lanka 3rd T20I :  टीम इंडियानं तिसऱ्या व निर्णायक सामन्यात तामिळनाडूचा जलदगती गोलंदाज संदीप वॉरियर याला पदार्पणाची संधी दिली. नवदीप सैनीला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली आणि त्याला आजच्या लढतीला मुकावे लागले. टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् तो टीम इंडियाच्या अंगलट आला. पहिल्याच षटकात दुष्मांता चमिराच्या चेंडूवर धवन स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०१४नंतर धवन प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला. तसेच ट्वेंटी-२०त गोल्डन डकवर बाद होणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. ( Shikhar Dhawan is the first Indian captain to register a golden duck in T20Is.)

धवन बाद झाल्यानंतर टीम इंडियाची भीस्त युवा खेळाडूंवर होते. आयपीएलमध्ये टोलेजंग षटकार खेचणारा देवदत्त पडिक्कल व ऋतुराज गायकवाड खेळपट्टीवर होते. त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु चौथ्या षटकात दोघांमधील ताळमेळ चुकला अन् देवदत्त ( ९) धावबाद झाला, परंतु तत्पूर्वी रमेश मेंडिसनं पायचीतची अपील केली होती आणि त्यावरच त्याला बाद देण्यात आले. वनिंदू हसरंगानं टीम इंडियाला एकामागोमाग दोन धक्के दिले. संजू सॅमसनचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कामय राहिला. हसरंगानं त्याला ( ०)  पायचीत केले आणि त्यानंतर ऋतुराजचीही ( १४) विकेट घेतली. भारताचे ४ फलंदाज २५ धावांवर माघारी परतल्यानं भुवनेश्वर कुमारला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागलं.

टीम इंडियाची अखेरची होप नितिश राणा यालाही ६ धावांवर माघारी परतावे लागले. कर्णधार दासून सनाकानं त्याच्याच गोलंदाजीवर राणाची रिटर्न कॅच घेतली. भारतानं पहिल्या १० षटकांत ५ बाद ३९ धावा केल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निचांक कामगिरी आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशिखर धवनसंजू सॅमसन
Open in App