Join us  

IND Vs SL 2nd T20I Live : राहुल द्रविडचे 'ते' प्रेरणादायी बोल अन् दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया झाली तयार... 

IND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ जुलैला होणारा दुसरा सामना स्थगित करण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 7:20 PM

Open in App

IND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ जुलैला होणारा दुसरा सामना स्थगित करण्यात आला आणि नव्या वेळापत्रकानुसार २८ व २९ जुलैला दुसरा व तिसरा ट्वेंटी-२० सामना होणार आहे. कृणालच्या संपर्कात आलेल्या आठही खेळाडूंची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली आहे, परंतु त्यांना विलगिकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे आता भारताकडे शिखर धवन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन आणि नितिश राणा हे चार फलंदाज आहेत. ( Shikhar Dhawan, Devdutt Padikkal, Sanju Samson and Nitish Rana are the only 4 batsmen available for the 2nd T20i against Sri Lanka)  त्यांच्यासह टीम इंडियाला श्रीलंकेचा सामना करावा लागणार आहे. 

टीम इंडिया संकटात असताना राहुल द्रविड नेहमीच संकटमोचकाच्या भूमिकेत दिसला आताही तो तिच जबाबदारी पार पाडत आहे. ९ खेळाडू अचानक मालिकेबाहेर गेल्यानंतर कोणत्याची टीमचे मनोबल खचले असते, परंतु द्रविडनं तसे होऊ दिले नाही. त्याचे ते बोल खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करणारे ठरत आहेत... 

कोणते ९ खेळाडू मालिकेला मुकणार?कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, इशान किशन, कृष्णप्पा गौथम, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, युजवेंद्र चहल व मनिष पांडे ( Deeepak Chahar, Manish Pandey, Krunal & Hardik Pandya brothers, Manish Pandey, Suryakumar Yadav, Ishan Kishan.) 

राहुल द्रविड म्हणाला, जर भारतीय संघाकडून खेळण्यासाठी तुमची निवड झाली असेल, तर १५ खेळाडू असोत किंवा २०, तुमच्यात अंतिम ११ मध्ये खेळण्याची क्षमत आहे. या प्रत्येकाची निवड ही त्यांच्या कामगिरीच्या जोरावरच झाली आहे. 

तो पुढे म्हणाला, कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आज खेळणार नाहीत. आमच्याकडे ११ खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही मैदानावर उतरणार आहोत. संघाचे संतुलन किंचितसे बिघडले आहे. भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया, इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाराहूल द्रविडक्रुणाल पांड्या
Open in App