Join us  

IND Vs SL 2nd T20I Live : शिखर धवननं जबाबदारी सांभाळली, पण त्याला साथ नाही मिळाली; श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारी कामगिरी

IND vs SL 2nd T20I Int Live Score : पाच स्पेशालिस्ट फलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 9:27 PM

Open in App
ठळक मुद्देशिखर धवननं मोडला विराट कोहलीचा विक्रम, श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला.

IND vs SL 2nd T20I Int Live Score : पाच स्पेशालिस्ट फलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक लावलेला दिसला. संघातील सर्वात अनुभवी फलंदाज कर्णधार शिखर धवननं ४० धावांची खेळी केली, परंतु अन्य फलंदाज अपयशी ठरले. संजू सॅमसननं आणखी एक संधी गमावली अन् विचित्र पद्धतीनं बाद होऊन तो माघारी परतला. 

कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेत गोंधळ उडाला. कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी ते विलगिकरणात असल्यानं त्यांना उर्वरित मालिकेत खेळता येणार नाही.  मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चार नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. २००७मध्ये स्कॉटलंडविरुद्ध भारतानं एकाच सामन्यात चार पदार्पणवीर उतरवले होते. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 2nd T20I  

श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, नितिश राणा आणि चेतन सकारिया या चार खेळाडूंनी पदार्पण केले. देवदत्त पडिक्कल हा  २१ व्या शतकात जन्मलेला व टीम इंडियाकडून पदार्पण करणारा पहिलाच खेळाडू ठरला.  शिखर धवननं मोडला विराट कोहलीचा विक्रम, श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. शिखर धवनने ( ३४०*) धावा करत  विराट कोहली ( ३३९), लोकेश राहुल ( २९५ ),  रोहित शर्मा (२८९) व सुरेश रैना ( २६५ ) यांना मागे टाकले.  Ind vs SL 2021 Live Score, Ind vs SL 2021 Live Updates ऋतुराज गायकवाड व धवन यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. ऋतुराजने काही सुरेख फटके मारून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं शिखरसह पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. ७व्या षटकात ऋतुराज (२१ धावा) झेलबाद झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकांत सुरेख कामगिरी करताना टीम इंडियाला १ बाद ६१ धावा बनवू दिल्या. देवदत्त आणि शिखर यांनाही फटकेबाजी करता येत नव्हती. दोघांची ३२ धावांची भागीदारी अकिला धनंजयानं संपुष्टात आली. शिखर ४२ चेंडूंत ४० धावांवर माघारी परतला. IND VS SL Live 2nd T20I, IND vs SL 3rd 2nd T20I Live देवदत्त व संजू सॅमसन यांना मोठी खेळण्याची संधी होती, परंतु त्यांनाही खुलून फटके मारता आले नाही. वनिंदु हसरंगा यानं टाकलेल्या १६व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर देवदत्तनं सुरेख रिव्हर्स स्वीप मारून चौकार मिळवला, परंतु पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. सॅमसनही ( ७)  पुढच्या षटकात धनंजयाच्या गोलंदाजीवर विचित्र पद्धतीनं बाद झाला. धनंजयाच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू त्याच्या बॅट लागून यष्टिंवर जाऊन आदळला. यष्टिरक्षकाला ही विकेट मिळवण्यासाठी काहीच करावे लागले नाही. धनंजयानं २९ धावांत २ विकेट्स घेतल्या. भारताला २० षटकांत ५ बाद१३२ धावा करता आल्या. IND Vs SL 2021, IND VS SL Live ODI Match Today

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासंजू सॅमसनशिखर धवन
Open in App