Join us

Ind vs SL 1st ODI : श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत, चमारा कपूगेदारा बाद

रणगिरी दम्बुल्ला मैदानावर आज होणाऱ्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 17:02 IST

Open in App

दाम्बुला, दि. 20 - तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने श्रीलंकेवर विराट विजय मिळावल्यानंतर आजपासून पाच एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. रणगिरी दम्बुल्ला मैदानावर आज होणाऱ्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचा सलामीवीर धनुष्का गुणथिलका युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. फटकेबाजी करण्याच्या जोशात गुणथिलकाने चहलच्या चेंडूवर लोकेश राहुलकडे झेल दिला. केदार जाधवच्या चेंडूवर डिकवेल बाद झाला आहे. डिकवेल 64 धावा काढून माघारी परतला आहे. तर अक्षर पटेलने कुशल मेंडिसला बाद करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. उपुल थरंगा आणि चमारा कपूगेदाराही माघारी परतला आहे. आतापर्यंत श्रीलंकेचे पाच गडी तंबूत परतले आहेत. 

भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवला असून वन-डे सामन्यांच्या मालिकेतही हीच लय कायम राखण्यास पाहुणा संघ उत्सुक आहे. ही मालिका अन्य मालिकेप्रमाणे राहणार नाही, हे निश्चित. कारण निवड समितीप्रमुख एमएसके प्रसाद यांनी इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होणाºया विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फिटनेसवर विशेष लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.कसोटी मालिका गमावल्यानंतर वन-डे सामन्यांच्या मालिकेत उपुल थरंगाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचा संघ अधिक धोकादायक झाला आहे. पराभवाचा वचपा काढण्यासाठी  भारताला कडवं आव्हान देण्याचं आव्हान श्रीलंकेसमोर असणार आहे. याआधी चॅम्पियन्स करंडकात श्रीलंकेने भारताला पराभवाचा धक्का दिलेला आहे. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ