मँंचेस्टर: भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात आतापर्यंत ७ वेळा आमने- सामने आले आहेत. त्यात प्रत्येक वेळी भारतानेच विजय मिळवला आहे. मात्र रविवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ८९ धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला.
या सामन्यात भारताने ५० षटकांत ५ बाद ३३६ धावा केल्या. तर पाकिस्तान डकवर्थ लुईस नियमानुसार ४० षटकांत ३०२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानच्या संघाला ४० षटकांत २१२ धावाच जमवता आल्या. या सामन्यातील विजय हा सर्वात मोठा विजय आहे.
या आधीच्या विजयातील अंतर
१९९२ - ४३ धावा
१९९६ - ३९ धावा
१९९९ - ४७ धावा
२००३ - ६ गडी
२०११ - २९ धावा
२०१५ - ७६ धावा