IND vs PAK, Women's T20 World Cup: भारत - पाकिस्तान सामन्यात मोठा घोळ! ७ चेंडूंची ओव्हर अन् शेवटच्या चेंडूवर चौकार

नक्की कधी घडला हा प्रकार, कोणाची होती बॅटिंग... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:52 PM2023-02-13T15:52:25+5:302023-02-13T15:53:25+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan womens t20 world cup 2023 big blunder by umpire as bowler bowled 7 ball over twisted the match result | IND vs PAK, Women's T20 World Cup: भारत - पाकिस्तान सामन्यात मोठा घोळ! ७ चेंडूंची ओव्हर अन् शेवटच्या चेंडूवर चौकार

IND vs PAK, Women's T20 World Cup: भारत - पाकिस्तान सामन्यात मोठा घोळ! ७ चेंडूंची ओव्हर अन् शेवटच्या चेंडूवर चौकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs PAK, Women's T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला नमवून शानदार कामगिरी केली. रविवारी न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात जेमीमा रॉड्रीग्जच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने सात गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी आपल्या संघाचा विजय निश्चित केला असला, तरी या दरम्यान सामन्यातील मैदानावरील पंचांनी अशी एक चूक केली, ज्याची जाणीव पाकिस्तानी संघालाही झाली असेल. भारतीय संघाच्या फलंदाजी दरम्यान, पाकिस्तानी संघ प्रत्येक धाव रोखण्यासाठी अतिपरिश्रम घेत होता, त्याच वेळी पंचांच्या चुकीमुळे पाकिस्तानी गोलंदाजाने एका षटकांत सात चेंडू टाकल्याची घटना घडली.

पाकिस्तानचा कर्णधार बिस्मा मारूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी १४९ धावा केल्या. न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर हे लक्ष्य गाठणे भारतासाठी सोपे नव्हते. पण फलंदाजांच्या कामगिरीमुळे प्रत्येक चेंडू पाकिस्तानला पराभवाकडे घेऊन जात होता. अशा परिस्थितीत गोलंदाजाने कोणतीही चूक केली नसतानाही तिला अतिरिक्त चेंडू टाकला असेल तर यात चूक कोणाची धरणार, असा केवळ सवालच कर्णधार करू शकतो.

निदा दारने ७ चेंडूंचे षटक टाकले!

भारताच्या डावातील ७ व्या षटकाची आहे. भारताने जबरदस्त सुरुवात केली होती. कर्णधार मारूफने फिरकी गोलंदाज निदा दारकडे चेंडू दिला. निदाने पहिल्या सहा चेंडूत सहा धावा दिल्या. यानंतर अंपायरने पुन्हा तिला गोलंदाजी करण्यासाठी इशारा केला आणि निदाने सातवा चेंडू टाकला. या चेंडूवर रॉड्रिग्जने पॉइंटच्या दिशेने चौकार मारला. अंपायरकडून चेंडू मोजण्यात चूक झाली. त्याचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागला. तिने सातवा चेंडू टाकला होता याची कल्पना स्वत: निदाला नव्हती आणि त्यामुळेच तिने अंपायरला काहीही न सांगता सातवा चेंडू टाकला. अतिरिक्त चेंडूवर भारताला चार धावा मिळाल्या आणि शेवटच्या टप्प्यात भारतासाठी या चार धावा उपयोगी पडल्या.

अतिरिक्त चेंडूचे महत्त्व शेवट समजले!

सातवे षटक झाल्यानंतर सामन्यात एक विचित्र परिस्थिती ओढवली होती. दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर दिसून आली. दोन्ही संघांपैकी कोणता संघ जिंकेल हे निश्चित नव्हते. भारताने तीन विकेट्स खूप लवकर गमावल्या होत्या. अशा स्थितीत भारतावर मोठा दबाव होता. अशा वेळी त्या अतिरिक्त चेंडूवर मिळालेल्या चार धावा नसत्या तर आणखी दडपण वाढू शकले असते. सामन्या दरम्यान पाकिस्तानी संघाला आपली चूक लक्षात आली नाही. पण चूक जेव्हा समजली असेल तर तेव्हा त्यांना नक्कीच पश्चाताप झाला असेल.

Web Title: India vs Pakistan womens t20 world cup 2023 big blunder by umpire as bowler bowled 7 ball over twisted the match result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.