ठळक मुद्दे२४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. आतापासूनच या सामन्याचा माहोल तयार होण्यास सुरूवात झाली आहे.
Ind Vs Pak T20 World Cup : २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India Vs. Pakistan) या संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. T20 विश्वषचषकातील सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. परंतु आतापासूनच या सामन्याचा माहोल सुरू होताना दिसत आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं मौका मौका या जाहिरातीवरून पाकिस्तानचा गोलंदाज (Shoaib Akhtar) याची खिल्ली उडवली आहे. भारताविरोधात सामना जिंकण्याचा पाकिस्तानला काही चान्सच नसल्याचं तो म्हणाला.
"तुमच्या खेळण्याचा काय फायदा, मी हे शोएब अख्तरला सांगितलं आहे. यापेक्षा चांगंल म्हणजे तुम्ही आम्हाला वॉकओव्हरच द्या. तुम्ही सामना खेळलात तर तुमचा पराभव होणारच. मग तुम्ही अपसेटही व्हाल," असं हरभजन म्हणाला. "शोएब अख्तर भाई यावेळी कोणताही चान्स नाही. आमचा संघ उत्तम खेळत आहे आणि तो सहजरित्या सामन्यात विजय मिळवेल," असंही त्यांनं स्पष्ट केलं.
... तर परत येऊ देणार नाही"यूएईसाठी रवाना होत आहोत. अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचा पाठिंबा सर्वांत महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. आपल्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. सहकार्य करत राहा. प्रार्थना करत राहा आणि विश्वास कायम ठेवा, असं ट्विट बाबर आझमनं केलं आहे. यासोबत पाकिस्तान झिंदाबाद असा हॅशटॅगही जोडला आहे. यावर, अनेक युझर्सनी प्रतिक्रिया केल्या आहेत. अनेकांनी पाक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही चाहत्यांनी सल्लेही दिले आहेत. एका चाहत्याने तर भारताविरोधात जिंकला नाहीत, तर परत येऊ देणार नाही, अशी तंबीही दिलीय.