आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तासोबत खेळण्यावरून विरोध होत असताना टीम इंडियाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. एवढेच नाही तर संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलनही केलेले नाही. याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच आता पाकिस्तानी फॅनने पाकिस्तान संघ अफगाणिस्तानविरोधातही जिंकू शकत नाही. यामुळे पाकिस्तानने फायनलमध्ये जावे म्हणून भारतीय संघाने पुढील सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी केली आहे.
या पाकिस्तानी फॅनचा पाकिस्तानी संघाला रोस्ट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतीय संघाने पाकिस्तानला सात विकेट राखून पाणी पाजले आहे. भारतीय कप्तानाने हा विजय पहलगाममधील शहीदांना समर्पित केल्याचे म्हटले आहे. अशातच आता पाकिस्तानी फॅनदेखील पाकिस्तान संघाला शेलक्या शब्दांत टोले हाणू लागले आहेत.
आमचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध जिंकू शकत नाही. आम्ही फक्त भारताला पुढील सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करू शकतो जेणेकरून आम्हाला दोन गुण मिळतील आणि अंतिम फेरीत पोहोचता येईल, असे या पाकिस्तानी फॅनने म्हटले आहे. भारतीय चाहत्याने आम्ही अंतिम फेरीत असणार असे सांगितले त्यावर पाकिस्तानी फॅनने पाकिस्तानी संघाला रोस्ट केले आहे.
लोक या व्हिडिओवर मजेदार मीम्स बनवत आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीत भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकमेकांसमोर येऊ शकतात. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर जेतेपदाच्या सामन्यातही लढत होण्याची शक्यता आहे.