Join us

India Vs Pakistan: बदली खेळाडू म्हणून आला अन् 'हिरो' झाला!; पाहा Video

India Vs Pakistan: सेट झालेला शोएब आणि कर्णधार सर्फराझ यांची जोडी जमली असती तर ती डोकेदुखी ठरू शकत होती. परंतु, केदार जाधव आणि मनीष पांडेनं भारताला सुखद धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 19:21 IST

Open in App

दुबईः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा 'ऑल राउंडर' हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागल्यानं बदली खेळाडू म्हणून आलेला मनीष पांडे 'हिरो' झाला. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदचा झेल त्यानं सीमारेषेवर असा टिपला की सगळेजण बघतच बसले.  

शोएब मलिक आणि बाबर आझम यांची जोडी फुटल्यानंतर भारताच्या शिलेदारांमध्ये नवा जोश संचारला होता. अर्थात, सेट झालेला शोएब आणि कर्णधार सर्फराझ यांची जोडी जमली असती तर ती डोकेदुखी ठरू शकत होती. परंतु, केदार जाधव आणि मनीष पांडेनं भारताला सुखद धक्का दिला. केदारचा चेंडू हवेतून सीमापार धाडण्याचा प्रयत्न सर्फराझने केला होता. परंतु, मनीषनं सीमारेषेवर अफलातून कॅच घेतला. त्याच्या या कौशल्याला नेटकऱ्यांनी भरभरून दाद दिली. 

 

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तान