Join us  

India Vs Pakistan, Latest News: भारत-पाक सामन्याचे पास हवेत, विराट कोहलीचा खास मॅसेज!

भारत vs पाकिस्तान लाइव्ह : क्रिकेट सामना कोणताही असो, तो याची देही याची डोळा पाहायला कोणाला आवडणार नाही? त्यात जर तो सामना भारत व पाकिस्तान या कट्टर वैऱ्यांमध्ये असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 9:47 AM

Open in App

India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : क्रिकेट सामना कोणताही असो, तो याची देही याची डोळा पाहायला कोणाला आवडणार नाही? त्यात जर तो सामना भारतपाकिस्तान या कट्टर वैऱ्यांमध्ये असेल तर... वर्ल्ड कप स्पर्धेत आज हे सख्खे शेजारी एकमेकांना भिडणार आहेत. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर हा सामना पाहण्यासाठी केवळ उभय देशांतूनच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहते येथे दाखल झाले आहेत. अनेकांना या सामन्याची तिकीटं मिळालेली नाहीत, त्यामुळे ते निराश झाले आहेत. पण, कोणीतरी या सामन्याची पासेस द्यावी अशी भाबडी आशा त्यांना आहे. पासेससाठी प्रयत्नही करत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्यांच्यासाठी खास संदेश पाठवला आहे.

''वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी तुम्ही जेव्हा घर सोडता, तेव्हा तुम्हाला आयोजकांना त्याची कल्पना द्यावी लागते. आम्ही येऊ का, असे माझे मित्र मला विचारत होते. मी त्यांना सांगितलं, 'तुम्हाला यायचंय तर या अन्यथा घरच्या टीव्हीवरच सामन्याचा आनंद लुटा.' एकदा का तुम्ही पास द्यायला सुरुवात केली, की त्याचा चुकीचा पायंडा पडतो. मग दोनाचे चार, चाराचे आठ होत जातात. आम्हाला ठरावीक पास मिळतात आणि त्यात कुटुंबीयांना आम्ही प्राधान्य देतो. त्यामुळे पाससाठी विचारणा केल्यास आवडत नाही,'' असे कोहलीनं सांगितले. गुड न्यूज, मँचेस्टरमध्ये सूर्यानं दिलं दर्शन, पण... भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्रामाची जय्यत तयारी दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांकडून झालेली आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आणि मैदानाबाहेर चाहत्यांची आतापासूनच रिघ लागलेली आहे. या सामन्यात कोण जिंकेल, कोण अधिक धावा करेल; यापेक्षा हा सामना होईल की नाही हा प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करून राहिलेला आहे. काल रात्रीपासून येथे पावसाच्या सरी बरसल्या होत्या आणि रविवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मँचेस्टर येथीस सद्यस्थिती पाहता सूर्यानं सकाळच्या सत्रात तेथे दर्शन दिले आहे आणि मळभही दूर झालेलं पाहायला मिळत आहे. पण...

आज मँचेस्टरमध्ये दोनच रंग पाहायला मिळत आहेत... एक म्हणजे निळा आणि दुसरा हिरवा... त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांनी मँचेस्टर हाऊसफुल झालं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम लढतीपेक्षा भारत-पाक लढतीची जगभरात उत्सुकता आहे. त्यामुळे पावसामुळे हा सामना रद्द होऊ नये, अशी प्रार्थना सर्वच करत आहेत. सध्या तरी मँचेस्टर येथील ढगाळ वातावरण दूर झाल्याचं चित्र दिसत असलं तरी दुपारनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लंडनमधील हवामान खात्यानं आतापर्यंत वर्तवलेला अंदाज खोटा ठरलेला नाही. पण, यावेळी तो खोटा ठरावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.   

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीभारतपाकिस्तान