मँचेस्टर - जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढतीत भारताच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकांमध्ये 336 धावा कुटल्या. दरम्यान, या लढतीत आक्रमक फलंदाजी करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली अगदी विचित्र पद्धतीने बाद झाला. मात्र भारताचा डाव संपल्यानंतर आता विराटच्या बाद होण्याचीच चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत 65 चेंडूत 77 धावा ठोकणारा विराट कोहली 48 व्या षटकात मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. आमीरने टाकलेला षटकातील उसळता चेंडू विराटच्या डोक्यावरून यष्टीरक्षक सर्फराझ अहमदच्या हातात गेला, तिकडे आमीरने जोरदार अपील केले. पण पंचांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मात्र विराट कोहलीने पंचांकडे लक्ष न देता तंबूची वाट धरली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs Pakistan, Latest News: विराटची अतिघाई! नाबाद असतानाही परतला तंबूत
India Vs Pakistan, Latest News: विराटची अतिघाई! नाबाद असतानाही परतला तंबूत
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत आक्रमक फलंदाजी करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली अगदी विचित्र पद्धतीने बाद झाला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 19:59 IST