India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकची विजयाची पाटी कोरीच राहिली. भारताचा हा पाकिस्तानवरील सातवा विजय ठरला. भारताच्या 336 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसामुळे अनेकदा खेळ थांबवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे आव्हान मिळाले आणि तेव्हा पाकिस्तानने 35 षटकांत 6 बाद 166 धावा केल्या होत्या. हे आव्हान अवाक्याबाहेरचे ठरल्याने नंतर पाकने विजयाचे सर्व प्रयत्नही सोडले आणि केवळ सामना पूर्ण होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली होती. त्यामुळे सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनं भारतीय संघाचे अभिनंदन केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Pakistan : पाकिस्तानचा पराभव होण्यापूर्वीच शाहिद आफ्रिदीकडून टीम इंडियाचं अभिनंदन!
India vs Pakistan : पाकिस्तानचा पराभव होण्यापूर्वीच शाहिद आफ्रिदीकडून टीम इंडियाचं अभिनंदन!
India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकची विजयाची पाटी कोरीच राहिली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 12:50 IST