Join us  

India Vs Pakistan, Latest News: भारतानं पाकला नमवल्यास रोनल्डोलाही होईल आनंद, वीरूनं सांगितलं कारण!

भारत vs पाकिस्तान लाइव्ह : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:00 AM

Open in App

India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत व पाकिस्तान या  महामुकाबल्याची जगभरातील चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे  हा सामना होणार आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास पाहता भारताने सहाही सामन्यांत पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे याही वेळेस हाच निकाल पाहायला मिळेल, असा विश्वास भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केला आहे. पण, त्याचवेळी भारत जिंकल्यास पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही आनंद होईल, असंही तो म्हणाला. वीरूनं यामागचं कारणही सांगितलं.  

वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातल्या जय-पराजयाच्या आकडेवारीत भारतीय संघ 6-0 अशा आघाडीवर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारा भारतीय संघ तिच विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. भारताने आज विजय मिळवल्यास जय पराजयाची आकडेवारी 7-0 अशी होणार आहे. ''भारत-पाकिस्तान हा नेहमीच मोठा सामना होतो. मग तो वर्ल्ड कप स्पर्धेतील असो किंवा जगाच्या पाठीवर कोठेही. तो महामुकाबलाच असतो,'' असे सेहवाग म्हणाला.

त्यानं पुढे सांगितले की,''भारत-पाकिस्तानचे चाहते कोठेही राहत असतील, परंतु ते रविवारी मँचेस्टर येथील सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार हे नक्की. वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास पाहिला, तर भारताचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. भारताने सहावेळा पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे आणि रविवारी या निकालाचीच पुनरावृत्ती होईल. भारतानं 7-0 अशी आघाडी मिळवल्याचा ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही आनंद होईल. कारण, त्याच्या जर्सीचा क्रमांक हा सात आहे.''

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच चाहत्यांची पार्टी, पाहा स्पेशल व्हिडीओ!भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन दिवसांपूर्वीच दोन्ही देशांचे चाहते मँचेस्टर येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे मँचेस्टरमध्ये सध्या दोनच रंग पाहायला मिळत आहेत, एक तर निळा आणि हिरवा... या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी चाहत्यांच्या उत्साहात किंचितशीही कमी झालेली नाही. या लढतीपूर्वी चाहत्यांनी एकत्र मिळून पार्टी केली. पाहा त्याचा व्हिडीओ... 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानख्रिस्तियानो रोनाल्डोविरेंद्र सेहवाग