चॅपियन्स ट्रॉफी 2025 च्या भापत-पाकिस्तान सामन्यात काल भारताने पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला. यानंतर, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर टीम आणि टीम मॅनेजमेंटवर जबरदस्त भडकला आहे. तो म्हणाला, 'आपण नाराज नाही. कारण काय होणार, हे आपल्याला माहीत होते.' भारतीय संघाने पाकिस्तानचा 6 विकेटने पराभव करून साधारणपणे टोर्नामेंटमधून बाहेरच केले आहे.
मात्र, पाकिस्तान संघ अद्याप टोर्नामेंटमधून पूर्णपणे बाहेर झालेला नाही. आपला सामना ते कितीही अंतराने जिंकले, तरी त्याने त्यांचा नॉकआउटमध्ये पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त होणार नाही. कारण, आता पाकिस्तानचे भविष्य न्युझिलंड संघाच्या निकालावर अधिक अवलंबून आहे. यामुळे, न्यूझीलंडचा बांगलादेश आणि भारताकडून पराभव व्हावा, अशी पाकिस्तानची नक्कीच इच्छा असेल. तसेच पाकिस्तानलाही बांगलादेशचा पराभव करणे आवश्यक आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर, शोएब अख्तरने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेर केला आहे. यात तो म्हणतो, "आपल्याला वाटत असेल की, मी फार नाराज आहे. मी कदापी नाराज नाही. याचे एक कारण आहे. कारण, काय होणार? हे मला माहीत होते. आपण जोवर पाचवा गोलंदाज सेट करणार नाही, जग चांगल्या चांगल्या गोलंदाजांना खेळवत आहे. आपण पाच बॉलर्स सेट करू शकत नाही. आपण ऑलराउंडर्स घेऊन जाता, मला माहीत नाही आपण काय विचार करता. हे एक अविचारी आणि अज्ञानी व्यवस्थापन आहे आणि मी खरोखर निराश आहे."
रावलपिंडी एक्सप्रेस शोएब पुढे म्हणाला, "आता मुलांना आम्ही काय बोलणार? जसे मॅनेजमेंट, तशी मुले. कारण त्यांना करायचे काय हेही माहीत नाही. त्यांना इंटेंटसंदर्भात माहीत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे, स्कील सेट, त्यासंदर्भातही त्यांना माहिती नाही. रोहित प्रमाणे काय, विराट प्रमाणे अथवा शुभमन प्रमाणे, खेळतील. खरे तर, मी निराश आहे. मला वाटते की, ना त्यांना माहीत आहे, ना मॅनेजमेंटला माहीत आहे. बास नुसते खेळायला गेले. करायचे काय कुणालाच माहीत नाही. मी खरो खरच निराश आहे."
Web Title: India vs Pakistan Champions Trophy 2025 shoaib akhtar says i am not disappointed after pakistan lost to india as
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.