Join us

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल भुवनेश्वर कुमार काय म्हणाला ते पाहा...

पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याबरोबर गोलंदाजी करताना भुवनेश्वर थोडासा नर्व्हस होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 15:48 IST

Open in App
ठळक मुद्देसामन्यानंतर भुवनेश्वरची खास मुलाखत घेतली ती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने.

दुबई, आशिया चषक 2018 : पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत सामनावीर ठरला तो भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार. या सामन्यात भुवनेश्वरने भेदक मारा करत पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना बाद केले होते. सामन्यानंतर भुवनेश्वरची खास मुलाखत घेतली ती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने. या मुलाखतीमध्ये भुवनेश्वर नेमकं काय म्हणाला ते या व्हिडीओमध्ये पाहा...

दुखापतीमुळे भुवनेश्वरला इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत खेळता आले नव्हते. त्यानंतर तो थेट आशिया चषकात संघात परतला होता. त्यामुळे पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याबरोबर गोलंदाजी करताना भुवनेश्वर थोडासा नर्व्हस होता.

 

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तानभुवनेश्वर कुमारजसप्रित बुमराह