Join us

India vs Pakistan : चेंडू टाकल्यानंतर पंड्या जमिनीवर कोसळला, स्ट्रेचरवरून नेलं मैदानाबाहेर

India vs Pakistan Update: अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 18:47 IST

Open in App
ठळक मुद्देही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

दुबई, आशिया चषक 2018 : पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला मैदानात दुखापत झाली आहे. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची चिंता वाढली आहे.

 

अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

 

टॅग्स :आशिया चषकहार्दिक पटेलभारत विरुद्ध पाकिस्तान