Join us  

India Vs New Zealand World Cup Semi Final : फक्त ही एक गोष्ट घडली की भारत अंतिम फेरीत पोहोचणार

पण फक्त एक गोष्ट जर घडली, तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 8:00 PM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना थांबवावा लागला आहे. आता काही वेळात पंच खेळपट्टीची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतरच सामन्याबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. पण फक्त एक गोष्ट जर घडली, तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचू शकतो.

मँचेस्टरमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. कव्हर्स काढण्यात आलेले नाहीत. पण जर आता डकवर्थ-लुईस नियम लावला गेला तर भारतासाठी महागात पडू शकते. कारण सध्या न्यूझीलंडची ४६.१ षटकांत ५ बाद २११ अशी स्थिती आहे. जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला आणि ४६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारताला २३७ धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते.

पावासामुळे जवळपास एक तासाचा खेळ वाया गेला आहे. अजूनही मैदानातील कव्हर्स काढण्यात आलेले नाही. त्यामुळे आता सामना होणार की नाही, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. आता पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर सामना कधी सुरु करायचा आणि किती षटकांचा खेळवायचा, हा निर्णय घेण्यात येईल. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पंच मैदानाची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच सामना कधी खेळवायचा हा निर्णय घेण्यात येणार आहे.

हा सामना सुरु होणार की नाही, हे आपल्याला अर्ध्या तासात कळू शकते. पण जर हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला तर काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पावसामुळे जर सामना रद्द करावा लागला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे आता चाहते वरुण राजाकडे हेच मागणे मागत असतील.

पंच किती वाजता करणार खेळपट्टीची पाहणी, जाणून घ्या...भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आणला आहे. आता सामना नेमका कधी सुरु होणार, याची उत्सुकता साऱ्यांना आहे. पण आता खेळपट्टीची पाहणी कधी होणार, याची माहिती आमच्या हाती आली आहे.

पावासामुळे जवळपास एक तासाचा खेळ वाया गेला आहे. अजूनही मैदानातील कव्हर्स काढण्यात आलेले नाही. त्यामुळे आता सामना होणार की नाही, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. आता पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर सामना कधी सुरु करायचा आणि किती षटकांचा खेळवायचा, हा निर्णय घेण्यात येईल. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पंच मैदानाची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच सामना कधी खेळवायचा हा निर्णय घेण्यात येणार आहे.

पाऊस भारतासाठी धोकादायक, मिळणार मोठ्ठं टार्गेटपावसाचा सामन्यावर नेमका काय परीणाम होणार, याचा विचार आता सारे चाहते करत असतील. पण पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला तर भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते. कारण भारताला यावेळी नोठे टार्गेट मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

मँचेस्टरमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. कव्हर्स काढण्यात आलेले नाहीत. पण जर आता डकवर्थ-लुईस नियम लावला गेला तर भारतासाठी महागात पडू शकते. कारण सध्या न्यूझीलंडची ४६.१ षटकांत ५ बाद २११ अशी स्थिती आहे. जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला आणि ४६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारताला २३७ धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते.

उपांत्य सामन्यात व्यत्यय आल्यावर काय सांगतात आयसीसीचे नियम वाचा...भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीत पाऊस पडला आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. जेव्हा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा न्यूझीलंडची ५ बाद २११ अशी स्थिती होती. पण जेव्हा सामन्यात व्यत्यय येतो, तेव्हा आयसीसीने काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहे. आयसीसीचे हे नियम नेमके आहेत तरी काय, ते जाणून घ्या...

उपांत्य फेरीत जर पाऊस पडला आणि पूर्ण दिवस सामना होऊ शकला नाही किंवा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर आज सामना झाला नाही तर उद्या हा सामना पुन्हा खेळवण्यात येऊ शकतो. पण राखीव दिवशी सामना नव्याने सुरु होणार नाही, तर आता जी सामन्याची स्थिती आहे त्यानुसारच राखीव दिवशी सामना सुरु होणार.

जर उपांत्य फेरीची लढत बरोबरीत सुटला तर कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होणार, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. जर उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. यामध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक देण्यात येईल. या सुपर ओव्हरमध्ये जो सामना जिंकेल, तो अंतिम फेरीत पोहोचेल.

पावसामुळे जर हा सामना रद्द करण्याची पाळी आली, तर दोन्ही संघांतील सामन्यात नेमके काय झाले हे पाहावे लागते. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे या सामन्याचा निकाल महत्वाचा ठरत नाही. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर गुणतालिका पाहिली जाईल. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा सामना चौथ्या स्थानावर आहे.त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. त्यामुळे हा सामना जर रद्द झाला तर त्यामध्ये न्यूझीलंडचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारताला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

अंतिम सामना जर पावसामुळे रद्द करण्यात आला तर कोणता संघ विजेता ठरेल, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही तर विश्वचषक दोन्ही संघांना विभागून देण्यात येईल.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतन्यूझीलंड