- बाळकृष्ण परब मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना दोनशेपार मजल मारली आहे. या लढतीत पावसाने व्यत्यय आणल्याने खेळ थांबवावा लागला आहे. दरम्यान, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर उपांत्य लढतींमध्ये धावाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. विश्वचषकाच्या चार उपांत्य लढतीत भारतीय संघावर आव्हानाचा पाठलाग करण्याची वेळ आली असून, त्यापैकी तीन वेळा भारतीय संघ पराभूत झाला आहे. केवळ 1983 मध्ये भारताला उपांत्य फेरीत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणे शक्य झाले होते. त्यामुळे न्यूझीलंडला फार मोठी मजल मारता आली नसली तरी भारतीय संघाच्या या रेकॉर्डमुळे क्रिकेटप्रेमींची चिंता वाढण्याची शक्यता आहे. भारतीय संघ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सहावेळा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. तीन वेळा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तीनवेळा संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले होते. 1983, 2003 आणि 2011 च्या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीचे आव्हान पार करून अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.पैकी दोन उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत विजय मिळवला होता. तर 1983 मध्ये आव्हानाचा पाठलाग करत भारताने विजय मिळवला होता. विश्वचषकात आतापर्यंत चार उपांत्य सामन्यात भारताला धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागला होता. पैकी 1983 चा अपवाद वगळता इतर तीन वेळा भारताला पराभूत व्हावे लागले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs New Zealand World Cup Semi Final : चिंतेची बाब, वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना भारताचा रेकॉर्ड आहे खराब
India Vs New Zealand World Cup Semi Final : चिंतेची बाब, वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना भारताचा रेकॉर्ड आहे खराब
विश्वचषक स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर उपांत्य लढतींमध्ये धावाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे.
By बाळकृष्ण परब | Updated: July 9, 2019 20:45 IST