Join us

India vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर

ट्वेन्टी-20 मालिकेसह अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 18:47 IST

Open in App

नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताने न्यूझीलंडमधील पहिला सामना जिंकला होता. पण आता न्यूझीलंडमधील ट्वेन्टी-20 मालिकेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली खेळू शकणार नाही. 

 

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात आठ विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. पण ट्वेन्टी-20 मालिकेसह अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली खेळू शकणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोहलीला या पाचही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर फलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवला. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीला रोहित शर्मा व विराट कोहली यांची मिळालेली साथ यामुळे भारताने 156 धावांचे सुधारित लक्ष्य सहज पार केले. भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी केली. त्याने किवींच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. मोहम्मद शमीने तीन, तर युजवेंद्र चहलने दोन विकेट घेतल्या. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड