Join us

India vs New Zealand 4th ODI : किवी गोलंदाज ट्रेंट बोल्टचा विश्वविक्रम, सर्वात जलद 100  विकेट्सचा पराक्रम

India vs New Zealand: विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजांची फळी कशी ढेपाळते याची प्रचिती गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 12:56 IST

Open in App

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजांची फळी कशी ढेपाळते याची प्रचिती गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांवर तंबूत परतला आणि किवींनी 8 विकेट व 212 चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात किवी गोलंदाज ट्रेंट बोल्टने 10 षटकांत 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने एकाच देशात सर्वात जलद 100 विकेट्सचा विश्वविक्रम नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या वकार युनिसचा विक्रम मोडला. हॅमिल्टनवर झालेल्या चौथ्या वन डे सामन्यात बोल्टने भारताच्या रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, केदार जाधव व हार्दिक पांड्या यांना बाद केले. भारताविरुद्ध एकाच सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो न्यूझीलंडचा सातवा गोलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध न्यूझीलंड गोलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. या विक्रमात शेन बाँड ( 6/23) आघाडीवर आहे.   पाकिस्तानच्या युनिसने संयुक्त अरब अमिराती येथे 53 डावांत 100 विकेट्स घेतल्या होत्या. बोल्टने 49 डावांत न्यूझीलंडमध्ये 102 विकेट्स घेतल्या आहेत. या विक्रमात ग्लेन मॅकग्रा व ब्रेट ली ( 56 डाव, ऑस्ट्रेलिया) , शॉन पोलॉक ( 60 डाव, दक्षिण आफ्रिका), मकाया एनटीनी ( 61 डाव, दक्षिण आफ्रिका) आणि वासीम अक्रम व शेन वॉर्न ( 62 डाव, संयुक्त अरब अमिराती / ऑस्ट्रेलिया) यांचा क्रमांक येतो. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडन्यूझीलंड