Join us

India vs New Zealand 3rd ODI: न्यूझीलंडच्या संघात दोन महत्वाचे बदल

हे बदल न्यूझीलंडच्या किती पथ्यावर पडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 16:24 IST

Open in App

माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताविरुद्धच्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या संघात दोम महत्वाचे बदल करण्यात आले आहे. हे बदल न्यूझीलंडच्या किती पथ्यावर पडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका न्यूझीलंडने गमावली आहे. कारण पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळेच भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. भारताला न्यूझीलंडमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2009 साली विजय मिळवता आला होता. त्यानंतर भारताला 2018पर्यंत एकही एकदिवसीय मालिका जिंकता आली नव्हती. त्यानंतर आता थेट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवता आला आहे.

आगामी दोन सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या संघातून डग ब्रेसवेल आणि इश सोधी यांना वगळण्यात आले आहे. या दोघांच्या जागी न्यूझीलंडच्या संघात जेम्स नीशाम आणि टॉड अॅस्टल यांचा समावेश करण्यात आला आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताने न्यूझीलंडवर सहज मात केली. न्यूझीलंडवर मात करत भारताने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. आता यापुढे भारताला दोन्ही सामने गमवावे लागले तरी ही मालिका त्यांच्याच नावावर असेल.न्यूझीलंडच्या 243 धावांचा पाठलाग भारताने फक्त तीन फलंदाज गमावत पूर्ण केला. रोहित शर्माने संयत फलंदाजी करताना तीन चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीने 60 धावांची खेळी साकारली. अंबाती रायुडू (नाबाद 40) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 38) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 62 धावांची खेळी साकारली. रोहितने आपल्या या खेळीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण या सामन्यात दमदार फलंदाजी करताना रोहितने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे.

भारताला न्यूझीलंडमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2009 साली विजय मिळवता आला होता. त्यानंतर भारताला 2018पर्यंत एकही एकदिवसीय मालिका जिंकता आली नव्हती. त्यानंतर आता थेट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवता आला आहे.

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहली