Join us

India vs New Zealand T20 : हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला

India vs New Zealand T20: भारतीय संघाने उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडवर विजय मिळवून ट्वेंटी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 10:07 IST

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडवर विजय मिळवून ट्वेंटी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे आज होणारा सामना हा मालिका विजयासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय संघाला या सामन्यात आणखी एक एतिहासिक भरारी घेतली. पण दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याला लाजवणारा प्रसंग घडला. हजारो प्रेक्षकांसमोर एका महिलेने पांड्याला असे काही विचारले की त्यालाच त्याची लाज वाटली. 

कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेल्या अपमानास्पद विधानानंतर पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यांच्यावरील पुढील शिक्षेसाठी समिती नेमली आणि हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. अंतिम निकाल येईपर्यंत या दोघांना खेळण्याची मुभा मिळाली आणि पांड्या न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कामगिरीतून दमदार कमबॅक केले, परंतु कॉफी विथ करण नंतर मानगुटीवर बसलेले भूत त्याचा पाठलाग सोडण्याचं नाव घेत नाही. 

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात याची प्रचिती आली. एका महिलेने एक पोस्टर तयार केला आणि त्यावर तिनं पांड्या आज करके आया क्या? असे लिहिले होते. तिच्या या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पांड्याला मात्र मान खाली घालावी लागली.

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6भारत विरुद्ध न्यूझीलंड